सोलापूर ः येत्या दसरा मेळाव्याला शासनाने शिवसेनेला परवानगी दिलेली नाही त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात गेले असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करण्याचा डाव राज्यशासनाने आखला आहे. मात्र हा डाव युवा सैनिक कोणत्याही परिस्थितीत उधळून लावतील त्यामुळे शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या मेळाव्याला राज्यशासनाने गप्प गुमानपणे परवानगी द्यावी अन्यथा राज्यभरातून लाखो शिवसैनिक घेवून शिवाजी पार्कवर खुसु असा इशारा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला आहे.
येणार्या़ दसरा मेळाव्याची जय्यत तयारी शिवसेनेच्या वतीने सुरु झाली असतानाच दुसरीकडे शासनाने शिवाजी पार्कवरील मेळाव्याला अद्याप परवानगी दिलेली नाही.त्यामुळे शिवसेनेने कायदेशीरपणे परवानगी मागितली आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीत राजकारण न करता शिवसेनेची परपंरा कायम ठेवण्यासाठी रितसर परवानगी द्यावी अशी मागणी कोळी यांनी केली आहे. जर शिवसेनेच्या मेळाव्याला जाणिवपूर्वक अडचण करण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरातून तसेच विविध जिल्ह्यातील लाखो युवा सैनिक घेवून शिवाजी पार्कवर घुसु त्यानंतर होणार्या परिणामाला सर्वस्वी राज्यशासन जबाबदार राहिल असा इशारा ही कोळी यांनी दिला आहे.त्यामुळे दसरा मेळाव्याची तयारी कनिमी कावा पध्दतीने करु असा इशारा सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी राज्यशासनाला दिला आहे.
दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसेनेची तालुकानिहाय बैठक घेवून मेळाव्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शिवसैनिक या कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे शासनाकडून आडवणूक करुन घाणेरडे राजकारण केले जात आहे.याचा निषेध ही युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. जर रितसर परवानगी नाही मिळाली तर शिवाजी पार्कवर गनिमीकाव्याने घुसू असा इशारा दिला आहे.त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शासनाने रितसर परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.



















