Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 June 2025
in Solapur SMC
0
तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग
0
SHARES
380
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात मंगळवारी खंदक बाग आणि हुतात्मा बागेत स्वच्छता करण्यात आली. या महास्वच्छता अभियानात आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला.

यावेळी खंदक बाग, श्री सिद्धरामेश्वर तलाव परिसर, वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामांची आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी पाहणी केली. या महास्वच्छता अभियानामुळे शहरातील बागांना ‘ अच्छे दिन’ आल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी नोंदवली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250624-WA0061.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250624-WA0060.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250624-WA0059.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250624-WA0058.mp4

सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाशेजारील खंदक बागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत मंगळवारी सकाळी महास्वच्छता अभियानास प्रारंभ झाला. आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोलापूरकरांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बागेतील स्वच्छता केली.

आमदार कोठे म्हणाले, संपूर्ण शहर स्वच्छ राखण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे धोरण आहे. या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात खंदकबाग तसेच हुतात्मा बागेची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी स्वच्छतेबरोबरच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर शेजारील तलाव परिसर, गणपती घाट, वॉकिंग ट्रॅक, लेझर शो आदी ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोलापूरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामे करण्यात आली. मात्र ही कामे महापालिकेकडे वर्ग झाल्यानंतर अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सोलापूर शहरातील विशेषतः स्मार्ट सिटीतून झालेले सर्व प्रकल्प सुस्थितीत ठेवावेत, अशी मागणी याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे करण्यात आली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250624-WA0037.mp4

आगामी काळात सोलापूर शहरातील सामाजिक संस्था, मंडळे नागरिकांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवाव्यात. सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्याकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे त्याकरिता सोलापूर महानगरपालिका तसेच भारतीय जनता पार्टी लागेल ते सहकार्य करेल.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेतर्फे चौथा टप्प्यातील स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. सोलापूरकरांनी आपला कचरा त्यांच्या गाडीतच टाकावा. घंटागाडी न आल्यास सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रार करावी. या तक्रारीची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असेही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250624-WA0057.mp4

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, नागेश खरात, अंबादास करगुळे, दत्तात्रय पोसा, सुनील पाताळे, शिवा कामाठी, बजरंग कुलकर्णी, संतोष कदम, दत्ता पाटील, यशवंत पाथरूट, गुरु कवाडे, सागर अतनुरे, राजशेखर येमुल, प्रशांत पल्ली, प्रसाद पल्ली, अंबादास सकीनाल, यशवंत सलगर, राम गड्डम, विजय धोत्रे, श्रवण साबळे, अक्षय वाकसे, सतीश तमशेट्टी, संस्कार नरोटे, राणा यादव, अशोक कोडम, चंद्रकांत यमगर, विजय घुले, विश्वजीत देशमुख, सागर मुगळे, ओंकार होमकर, पिनु करपे, मनोज देवकर, रमण दुडम, आकाश पाटील, प्रकाश गाजुल, देविदास लिंबोळे आदी उपस्थित होते.

Tags: Devendra kotheSachin ombaseSolapur MNC
SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरासह या गावात दारू राहणार बंद

Next Post

विधानसभा उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं जंगी सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
विधानसभा उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं जंगी सत्कार

विधानसभा उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं जंगी सत्कार

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998914
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group