Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील मराठा समाजाचे नेते व नौकरीच्या नियुक्त्या मिळालेले उमेदवार छत्रपती शिवाजी महाराज चौकात का आले एकत्र

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 September 2022
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्य सरकारच्या धाडसी निर्णयामुळे मराठा समाजातील विविध खात्याअंतर्गत शासनाकडून १०६४ पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोलापुरातील १०२ मुले आणि मुली यांना शनिवारी महावितरणकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिंदे सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना नोकरीमध्ये न्याय मिळाला असल्याचे सांगत राज्य सरकारच्या निर्णयाचे मिठाई वाटून स्वागत करण्यात आले .तसेच जल्लोषही करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर यावेळी पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले.

२०१४ आणि २०१९ मध्ये नोकरीच्या प्रतीक्षा यादीत असलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजी महाराज यांच्यामुळे न्याय मिळाला आहे. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपासून हे सर्व मुली आणि मुली कामावर रुजू होत असून राज्य सरकारचे आभार मानावे तितके कमीच आहेत. मराठा समाजातील मुला-मुलींना न्याय मिळवून देण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संभाजी महाराजांचा मोठा वाटा आहे. जसा या उमेदवारांच्या नोकरीचा निर्णय घेतला तसाच मराठा आरक्षणाचा सुद्धा निर्णय घेऊन कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याबाबत शिंदे -फडणवीस  सरकारने निर्णय घ्यावा, महाराष्ट्रातील मराठा समाज सरकारच्या पाठीशी उभारल्याशिवाय राहणार नाही, असे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मराठा समाजातील या १ हजारहून अधिक युवक युवतींची हरवलेली भाकरी सरकारने मिळवून दिल्याबद्दल ही त्यांचे अभिनंदन करण्यात आले .एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मराठा मुख्यमंत्री लाभल्यामुळेच या १ हजारहून अधिक युवक युवतींना नोकरी मिळाली असल्याचे राजन जाधव यांनी सांगितले. या युवकांना नियुक्तीपत्रे देण्यापूर्वीची सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी वीज वितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जे कष्ट घेतले ते आपण कधीही विसरणार नसल्याचेही जाधव यावेळी बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा असल्याचेही राजन जाधव यांनी सांगितले.

आजपर्यंत आपण शासनाच्या विरोधात कायमच आंदोलन करत राहिलो. आज मात्र खऱ्या अर्थाने शिंदे- फडणवीस सरकारचे अभिनंदन करण्यासाठी सर्वजण जमलो आहोत. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना नोकरीमध्ये न्याय मिळाल्याचा आजचा हा आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मराठा समाजाला आरक्षण देणे काळाची गरज असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले. यावेळी महावितरणचे अभियंता दिघे उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या डाटा ऑपरेटर पदासाठी तीन वर्षांने होत आहे परीक्षा ; 29 व 30 सप्टेंबरला ; हे आहे परीक्षा केंद्र

Next Post

सोलापुरातील तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्रासह आता घरकुलासाठी भूखंड मिळणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातील तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्रासह आता घरकुलासाठी भूखंड मिळणार

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002583
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group