ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांची बदली राज्याचे कृषिमंत्री माणिकराव पाटील यांच्या ओएसडी पदी झाल्यानंतर ते पद रिक्त होते.
सुमारे दीड महिन्यानंतर त्यांच्या जागी धुळे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांची नियुक्ती झाली आहे. गणेश मोरे हे गुरुवारी सायंकाळी पदभार घेणार असल्याचे समजले.
गणेश मोरे यांनी यापूर्वी मोहोळ गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे.