अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 3 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणुकीस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मिळावी यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले. या प्रश्नात त्यांनी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.
पालकमंत्री गोरे यांनी तातडीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र देऊन काम मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भैरू लोंढे, प्रकाश रणदिवे, अमोल रणशिंगारे, निखिल पवार, अभिजीत डोलारे, गणेश वाघमारे, पृथ्वीराज लोंढे, महेश कांबळे, लखन अवघडे, कुणाल भोसले, रितेश बनसोडे, विकी लोंढे ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.