सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरांमध्ये एकूण 6 ठिकाणी पे अँड पार्कची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी 1) होम मैदान (जिल्हाधिकारी कार्यालय मागील बाजू) 2- होम मैदान ( नॉर्थकोट मैदान मागील बाजू ) 3 – पार्क स्टेडियम, 4-पारश इस्टेट ( नवी पेठ) 5- हुतात्मा बाग ते सुभाष चौक ,आसार मैदान जवळ. 6- राणी लक्ष्मीबाई मंडई या ठिकाणी पे अँड पार्कचे टेंडर काढण्यात आले आहे.
सोलापूर शहरातील व्यवसायिकांना आवाहन आहे की, त्यांनी यामध्ये सहभागी होऊन महापालिकेला सहकार्य करावे. टेंडर भरण्याचे अंतिम तारीख 10 ऑक्टोबर असून त्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावे असे आव्हान भूमी मालमत्ता विभागाकडून करण्यात आले.



















