सोलापूर:- जाईजुई विचार मंच च्या माध्यमातून अशोक चौक सोमपा भावनाऋषी हॉस्पिटल जवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधवा, गोरगरीब गरजू २१ महिलांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, सध्या नवरात्रीचे दिवस आहेत माझ्या गोरगरीब महिलांचा आशिर्वादच माझ्यासाठी देवीचा आशीर्वाद आणि गोरगरीब, कष्टकरी महिला भगिनींच्या आशीर्वादामुळे तीनदा निवडून आले. माझ्या निवडून येण्याचा फायदा गरजू महिलांना झाले पाहिजे म्हणून त्यांना अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विधवा, गोरगरीब गरजू महिला स्वताच्या पायावर उभे रहावे म्हणुन आज आपण शिलाई मशीनचे वाटप करतोय.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे म्हणाले की, आत्ता अनेक महिलांचे प्रतिक्रिया ऐकल्या तुमच्या वाईट परिस्थितीत तुमचे आमदार प्रणिती शिंदे धावून येतात त्यांच्या कार्यालयात सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत सर्वसामान्य नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करतात असे आमदार तुम्हाला लाभले आहेत.
यावेळी मा. परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, पूर्व भागातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















