सोलापूर : इंडियन टेक्स्टाईल अॅक्सेसरीज अॅण्ड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ITAMMA) आणि टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन (TDF) यांच्या संयुक्त विद्यमाने होटगी रोड वरील हॉटेल बालाजी सरोवर येथे शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ ते ८ दरम्यान सोलापुरात प्रथमच वस्त्रोद्योगांच्या वाढीला चालना देण्यासाठी ‘टेक्स्टाईल मशिनरी कॅटलॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ४० हून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने आणि कॅटलॉग प्रदर्शित करतील अशी माहिती ITAMMA चे अध्यक्ष पूर्विक पांचाळ आणि टीडीफचे अध्यक्ष श्रीनिवास बुरा यांनी दिली.
काय आहे ‘इंडियन टेक्सटाईल अॅक्सेसरीज अँड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ITAMMA)
‘इंडियन टेक्सटाईल अॅक्सेसरीज अँड मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही सर्वात मोठी आणि जुनी टेक्सटाईल इंजिनिअरिंग असोसिएशन आहे. ज्याला NABET द्वारे “डायमंड ग्रेड ने “राष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली आहे आणि या श्रेणीतील जबाबदार भारतीय BMOS अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण जबाबदारी साठी सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळाला आहे. ITAMMA चे कोईम्बतूर आणि अहमदाबाद येथील संपर्क कार्यालयात 450 हून अधिक सदस्य आहेत आणि ते नियमितपणे ITAMMA Voice” आणि “Textile Stores & Machinery Directory प्रकाशित करतात. यातील सदस्यांना त्यांचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करण्यासाठी कॅटलॉग शो, मशिनरी प्रदर्शन, सेमिनार, कार्यशाळा इत्यादी सारख्या किफायतशीर आणि वेळ वाचवणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.
या पत्रकार परिषदेस इटामाचे भावेश पटेल, एन डी म्हात्रे, टीडीएफचे सिद्धेश्वर गड्डम, संजय मडूर उपस्थित होते.



















