सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी पद देण्यात आले आहे. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक शुक्रवार 7 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती. मामा येणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते सुमारे एक तासापासून शासकीय विश्रामगृहावर थांबून होते.
विश्रामगृहात शहराध्यक्ष भारत जाधव, सोलापूर शहर निरीक्षक शेखर माने, प्रदेश सचिव संतोष पवार, माजी महापौर महेश कोठे, सुधीर खरटमल, यु एन बेरिया, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, प्रदेशच्या विद्या लोलगे, नलिनी चंदेले, तौफिक शेख, नूतन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी शहराध्यक्ष मनोज गादेकर, ज्येष्ठ नेते शफी इनामदार, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, ज्येष्ठ नेते शंकर पाटील, लता फुटाणे, बिस्मिल्ला शिकलगार, प्रशांत बाबर, रुपेशकुमार भोसले, रियाज मोमीन, इरफान शेख, मिलिंद गोरे, किशोर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सव्वा बाराच्या सुमारास भरणे यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. मामांचा लाडका भाचा आनंद चंदनशिवे हे त्यांच्याच गाडीतून सोबत आल्याचे पाहायला मिळालं.
मीटिंग हॉलमध्ये गेल्यानंतर गादेकर ठरल्याप्रमाणे मागच्या खुर्चीवर जाऊन बसले. खरटमल यांनाही बसायला खुर्ची नव्हती ते सुद्धा पाठीमागे बसले. तेव्हा महेश कोठे आणि बेरिया यांनी दोघांमध्ये जागा करून खरटमल यांना मध्ये बसवले.
गादेकर मागे बसल्याचे दिसताच भरणे यांनी महिलांना उठायला सांगितले त्या ठिकाणी तीन खुर्च्या बसण्यासाठी रिकामे केल्या. एका खुर्चीवर महेश गादेकर बसले, दुसऱ्या दोन खुर्चीवर तौफिक व आनंद चंदनशिवे यांना बसण्यासाठी जागा केली. काही वेळाने चंदनशिवे आणि शेख हे दोघे आल्यानंतर त्या खुर्चीवर बसले. यावेळी महिलांची कुचंबना झाल्याचे पाहायला मिळालं. शिकलगार यांनी सडेतोड भरणे मामांना विचारले केवळ महिलांना उठवता पुरुष मंडळी निवांत बसली आहेत तेव्हा बोलण्यात माहीर असलेल्या मामांनी महिलांसाठी समोर स्पेसमध्ये जागा केली आहे आपला पक्ष महिलांचा सन्मान करतो असे म्हणून वेळ मारून नेला.पहा हा व्हिडीओ….





















