सोलापूर येथील डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील तत्कालीन अधिष्ठाता डॉ सुनील घाटे आणि डॉ राजाराम पोवार यांची महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल ) नियम, १९७९ मधील नियम ८ अन्वये शिस्तभंग तथा विभागीय चौकशी करण्यासाठी सचिव व विशेष चौकशी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शिवाजी पाटणकर, सह सचिव, महाराष्ट्र शासन यांनी काढले आहे.
एस.एम.वाळकीकर,मुख्य प्रशासकीय अधिकारी(चौकशी अधिकारी) मुंबई यांचा अहवाल स्विकारुन त्यानुसार अनुकंपातत्वा खाली वर्ग-३ ची नोकरी मिळणे आणि माहिती अधिकार अधिनियम २००५ खाली व इतर स्त्रोताद्वारे माहितीवरुन जिवीतहानी, वित्तहानी व फसवेगिरी केल्याबद्दल (सिव्हिल हॉस्पीटल) श्री.छ.शि.म.स.रु.सोलापूर- येथील अधिकारी कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे,नुकसान भरपाई मिळणे, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे(बडतर्फ करणे, निलंबित करणे), माहिती मिळणे व पोलीस संरक्षण मिळणे, इच्छा मरणाची परवानगी मिळणेबाबत… या विषयासंबंधात दिनेशसिंग शीतल यांनी तक्रार दाखल केलेल्या अर्जावर कोणतेही कारवाई व कार्यवाही न केल्याने सदर चौकशी होणार आहे.
राज्यपाल, महाराष्ट्र यांनी यापुर्वी हि विभागीय चौकशी करण्यासाठी मान्यता दिली होती.तसेच आता पुन्हा नव्याने आदेश दिले आहेत.



















