Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्याला मिळाला नायक पालकमंत्री ; मुजोर अधिकारी येणार वठणीवर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 October 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – राज्यात 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा पासून सोलापूर जिल्ह्याला गेटकेन पालकमंत्री मिळाला आहे. सुरुवातीला दिलीप वळसे पाटील (#Dilip_walse_patil) ते केवळ तीन महिन्यातच गेले, कोरोना आला वयोमानानुसार त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री पद सोडले, त्यानंतर आले जितेंद्र आव्हाड (#Jitendra_Awhad) त्यांनी एक दौरा केला आणि त्यांना कोरोना झाला. त्याचं सुदधा पालकमंत्री पद गेलं. 

आता द्यायचे कुणाला असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेससमोर होता. शेवटी सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या इंदापूर तालुक्याचे आमदार राज्यमंत्री व धनगर समाजाचे एकमेव मंत्री दत्तात्रय भरणे (#Dattatray_Bharane) यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले. जरी गेटकेन असले तरी मामांनी सलग दोन सव्वा दोन वर्ष कोरोनाच्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये सोलापुरात आपले कामकाज केले, आपल्या स्वभावाने तसेच बोलण्यातील गोडव्याने त्यांनी प्रशासनाकडून काम करुन घेतले. सहसा कुणावरही कडक कारवाई त्यांनी केली नाही. जसे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी मामा होते तसेच ते प्रशासनातही मामा बनून राहीले. पालकमंत्र्यांच्या स्वभावाचाही अधिकाऱ्यांनी गैरफायदा घेतल्याचं पहायला मिळालं. बऱ्याच विभागाचे अधिकारी मुजोर झाले. 

बरोबर अडीच वर्षाने सरकार बदलले. चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्याला अनुभवी, अभ्यासू आणि आक्रमक समजले जाणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (#Radhakrushna_Vikhe_Patil) पालकमंत्री म्हणून लाभले आहेत. त्यांचा कार्यकाळ किती असेल हे जरी नक्की नसले तरी त्यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजनसमितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर आपला दरारा आणि छाप सोडली आहे. सोलापूर जिल्ह्यात मला किती अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल असा दम त्यांनी भरला त्यामुळं अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रकरणात त्यांनी संबधित कार्यकारी अभियंत्याला सरळ सरळ रजेवर पाठवले आहे. आणि त्याची चार अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी लावली. त्यानंतर आजपर्यंत कधीच ज्या अधिकाऱ्याचा कधीच विषय झाला नाही अशा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांना चांगलेच पळवले. एकाच वेळी इतके प्रश्न विचारले की, त्यांना उत्तर देतादेता ते घामेघुम झाले. त्यांच्या तक्रारी व  कामचुकारपणा पाहून सर्व आमदारांच्या मार्फत त्यांच्या कामकाजाची चौकशी राधाकृष्ण विखे पाटील यांनी लावली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच सुनावले, रस्त्याची डागडुजी करता तसे उत्तरे देऊ नका या शब्दात खरडपट्टी केली. जिल्हा भुमी अभिलेख अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन सभेत खडे बोल सूनावत “आमदारांची ही शेवटची तक्रार असे समजायचे, परत तक्रार आली तर मी ॲक्शन घेईन थोडीशी काळजी घ्या” पालकमंत्री विखे पाटील यांचे हे शब्द बरेच काही सांगून गेले. याचवेळी अनेकांमधून सोलापूर जिल्ह्याला प्रथमच “नायक” पालकमंत्री मिळाल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.

SendShareTweetSend
Previous Post

मोहोळ येथील लॉजमध्ये कुंटणखाना चालवण्या प्रकरणी न्यायालयाने दिला हा निकाल

Next Post

Viral Video | वाचलो रे बाबा ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती | वडाळ्यातील घटना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Viral Video | वाचलो रे बाबा ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती | वडाळ्यातील घटना

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986198
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group