Sunday, February 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात शनिवारी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन ; श्रीलंकेचे भंते यश यांच्या हस्ते होणार उद्घाटन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 May 2025
in Social, solapur
0
सोलापुरात शनिवारी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन ; श्रीलंकेचे भंते यश यांच्या हस्ते होणार उद्घाटन
0
SHARES
153
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात शनिवारी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन ; श्रीलंकेचे भंते यश यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

सोलापूर : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने क्रांतीप्रवण झालेल्या सोलापूर नगरीत शनिवार दि. 3 मे 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिरात( लुम्बीनी नगरीत) राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भंते यश यांची धम्मदेसना, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे मार्गदर्शन आणि विविध परिसंवादातून धम्म विचारांचा जागर होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बौद्ध साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता श्रीलंकेचे भंते यश यांच्या हस्ते होणार आहे.

 

यावेळी भंते यश यांची धम्मदेसना होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.यावेळी संमेलनाचे अध्यक्ष वाघमारे यांचे अध्यक्षीय भाषण होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव , पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे , जि.प.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जि.प.सोलापूर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख , कुर्डूवाडी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

 

दुपारी 1 वाजता पहिल्या परिसंवादात ” धर्मांतरोत्तर सामाजिक पुनर्बांधणीसाठी आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्यिकांची भूमिका कितपत पोषक ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. आनंद देवडेकर (मुंबई ) तर प्रा.डॉ. सारीपुत्र तुपेरे (सोलापूर) प्रा. डॉ. एम. डी. शिंदे (सोलापूर) या वक्त्यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 2 ते 2.30 दरम्यान सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

दुपारी 2.30 वाजता दुसरा परिसंवाद होणार असून यामध्ये “बौद्ध धम्माची आधुनिक काळात गरज”या विषयावर
प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजय मोहिते हे विचार मांडणार आहेत. यामध्ये प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे (सोलापूर), उपप्राचार्य प्रकाश शिंदे या मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.

 

दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या तिसऱ्या परिसंवादात “मराठी भाषेत बौद्ध साहित्य निर्मिती- काल – आज – उद्या ” या विषयावर
प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड (सोलापूर) तर साहित्यिक प्रा. डॉ. धम्मपाल माशाळकर (सोलापूर), पत्रकार, लेखक दत्ता थोरे हे विचार मांडतील.

 

सायंकाळी 4.30 वाजता
“धम्म चळवळीत महिलांचे योगदान “या विषयावर चौथा परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्रमुख वक्त्या प्रा. रेखा मेश्राम (छत्रपती संभाजीनगर) , प्रा. डॉ. अंजना गायकवाड(सोलापूर), प्रा. अहिल्या गायकवाड-कांबळे (सोलापूर), शारदा गजभिये (सोलापूर), धम्मरक्षिता कांबळे (सोलापूर) या विचार मांडणार आहेत.

 

दरम्यान, सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या पाचव्या परिसंवादात
” पाली भाषेतील बौद्ध साहित्य ” या विषयावर प्रमुख वक्ते तथा पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पाली भाषा विभाग प्रमुख प्रा.डॉ.विजयकुमार झुंबरे आणि
डॉ. औदुंबर मस्के (सोलापूर), प्रा. डॉ. देविदास गायकवाड(सोलापूर),
डॉ. सुभाष कांबळे (सोलापूर) आदी विचार मांडणार आहेत.

 

सायंकाळी 7 वाजता समारोप सत्रात प्रमुख अतिथी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर (मुंबई )हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी रिपाइं(ए) चे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे, ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, भीमशक्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष
सुबोध वाघमोडे, रिपाइंचे ज्येष्ठ नेतेे के. डी. कांबळे, बसपाचे प्रदेश महासचिव
अ‍ॅड. संजीव सदाफुले, कामगार नेते अशोक जानराव, कामगार नेते जनार्दन शिंदे,
माजी गटनेते आनंद चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध वाघमारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संमेलनास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस कोषाध्यक्ष किरण बनसोडे , समन्वयक डॉ. सुरेश कोरे , कार्यवाह भालचंद्र साखरे, प्रा. वशिष्ठ सोनकांबळे , अण्णासाहेब वाघमारे आदींसह कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

‘ मोहब्बत की किताब’
नाटिकेद्वारे संविधान जागर !

दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजता
प्रबोधनात्मक नाटिका ‘ मोहब्बत की किताब’ नाटिकेद्वारे संविधान जागर होणार आहे.राज्यकर निरीक्षक अभियंता बुद्धजय भालशंकर लिखित आणि भागवत कुवळेकर दिग्दर्शित या भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करणार्‍या लघु नाटिकेचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बुद्धजय भालशंकर, भागवत कुवळेकर, शशिकांत जाधव, सविता कुवळेकर यांची प्रमुख भूमिका राहणार आहे,असे समन्वयक डॉ. सुरेश कोरे यांनी सांगितले.

संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये –

* संमेलन विचार मंचाला “सारनाथ” तर ग्रंथदालनास “नालंदा” नाव
* एकूण 5 परिसंवाद तर एका लघुनाटिकेचा समावेश
* विविध महत्त्वपूर्ण विषयांवर
होणार ठराव मंजूर
* शाक्य संस्था, सिदनाक ब्रिगेड व समता सैनिक दल या तिन्ही दलाची एकसंघ सलामी * स्फूर्तीदायी गीतांचा कार्यक्रम
———-

Tags: Solapurबौद्ध साहित्य संमेलन
SendShareTweetSend
Previous Post

उत्साहात रंगला उत्तर सोलापूर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

Next Post

अजितदादांना महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा ;  बाबासाहेबांची माझी आत्मकथा व अण्णाभाऊ साठे यांचे फकिरा पुस्तक भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अजितदादांना महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा ;  बाबासाहेबांची माझी आत्मकथा व अण्णाभाऊ साठे यांचे फकिरा पुस्तक भेट

अजितदादांना महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा ;  बाबासाहेबांची माझी आत्मकथा व अण्णाभाऊ साठे यांचे फकिरा पुस्तक भेट

ताज्या बातम्या

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026
“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

16 January 2026
पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

16 January 2026

क्राईम

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1969995
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group