सोलापुर जिल्हा माध्यमिक व उच्च्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ,सोलापुर यांचे तर्फे देण्यात येणार्या आदर्श शाळा पुरस्कारामध्ये उत्तर सोलापुर मधून दिलीपराव माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय होनसळला आदर्श शाळेचा पुरस्कार मिळाला. शुक्रवार 07 ऑक्टोबर रोजी हुतात्मा स्म्रतीमंदीर,येथे हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण उपसंचालक विकास गरड यांच्या हस्थे स्वीकारण्यात आला.
प्रशालेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजित भडकुंबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. .यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ किरण लोहार, राजा सरवदे, सुभाष माने, वामन माने, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
शाळेस पुरस्कार मिळाल्याबद्दल, संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, उपाध्यक्ष अभिजित भडकुंबे, माजी सभापती रजनी भडकुंबे , संस्थेचे सचिव विकास बनसोडे, संचालक अमित भडकुंबे, तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी यांनी प्रशालेतील मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.




















