सोलापूर- मी शिंदे साहेबांनी भेटायला बोलावल्याने मी त्यांच्या बोगीत गेलो होतो , मी मोबाईल चोराला नसून सर्व प्रकार गैरसमजूतीमधून झाला, मला न्याय द्या ..माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मोबाईल चोरी प्रकरणात मंदार गुरव याने खुलासा केला आहे. याबाबत दादर पोलीस ठाणे येथे याची नोंद आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मोबाईल चोरीमुळे एकच खळबळ उडाली होती.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मोबाईल चोरी प्रकरणात माढा तालुक्यातील घाटणे गावाच्या मंदार गुरव याला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी माढा तालुक्यातील मंदार गुरव याने समोर येत साहेबाना भेटायला गेल्यावर हा सर्व प्रकार गैरसमाजातून झाला आहे. मी चोर नाही, मला न्याय मिळावा अशी विनंती गुरव याने केली आहे .
विनाकारण माझे कुटूबिंय तणावात आहेत.त्यांना फार त्रास झाला आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांना मंदारने जबाब देताना आपण मोबाईल चोरत नव्हतो तर फक्त सीटवरून बाजूला ठेवण्यासाठी उचलला असल्याचे मंदार गुरव याने सांगितले आहे . आता पोलीस तपासात सर्व प्रकार समोर येणार असला तरी सुशीलकुमार शिंदे यांनी त्याला बोलावल्याने मान्य केल्यास मंदार यास दिलासा मिळेल.

















