Saturday, April 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दोन्ही देशमुखांच्या बैठकीला काँग्रेसचे म्हेत्रे, शेळके, चाकोते तर राष्ट्रवादीचे साठे एकत्र ; बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूव्हरचना ठरली !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 April 2025
in Co -operative
0
दोन्ही देशमुखांच्या बैठकीला काँग्रेसचे म्हेत्रे, शेळके, चाकोते तर राष्ट्रवादीचे साठे एकत्र ; बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूव्हरचना ठरली !
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दोन्ही देशमुखांच्या बैठकीला काँग्रेसचे म्हेत्रे, शेळके, चाकोते तर राष्ट्रवादीचे साठे एकत्र ; बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूव्हरचना ठरली !

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांनी उभा केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पॅनलसाठी कंबर कसली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पॅनल मुळे नाराज काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांच्या घरोघरी जाऊन देशमुख हे भेटीगाठी घेत आहेत. यापूर्वीच त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेतले आहे.

सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे महादेव चाकोते, सिद्धाराम चाकोते, काँग्रेसचे जेष्ठ नेते जाफरताज पाटील त्यांच्या घरी जाऊन पाठिंबा घेतला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी ही पाठिंबा दिला आहे.

शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बळीराम साठे, महादेव चाकोते, बाळासाहेब शेळके, सिद्धाराम चाकोते, डॉक्टर हवीनाळे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचे बराच वेळ गुप्त बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीची व्यूव्हरचना ठरवण्यात आली आहे.

आमदार विजय देशमुख म्हणाले, बाजार समितीची निवडणूक ही शेतकऱ्यांची आहे सुभाष देशमुख यांनी उभा केलेल्या पॅनल मध्ये शेतकऱ्यांची मुलं उमेदवार आहेत त्यामुळे या ठिकाणी उपस्थित आम्ही सर्वांनी या पॅनलला पाठिंबा देऊन विजयी करण्याचा निर्धार केला आहे. मार्केट कमिटी आणि शेतकऱ्यांचे हित हवे असेल या राज्य आणि केंद्र सरकारचे मदत हवी असेल तर सुभाष देशमुख यांनी उभ्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पॅनल सोबत रहा असे आवाहन मतदारांना विजय देशमुख यांनी केले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250419-WA0042.mp4

सुभाष देशमुख म्हणाले, माझ्या विनंतीला मान देऊन सर्व नेते या ठिकाणी एकत्र आले त्यांचे आभार मानतो. हे कार्यकर्त्यांचे पॅनल आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे, कार्यकर्त्यांना न्याय देणारे पॅनल असून त्यासाठी सर्व मतदार सोबत राहतील आणि हे नेते आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250419-WA0041.mp4
Tags: @bazar committee election#MLA Vijay deshmukh#Sachin kalyanshettyMLA Subhash deshmukhSidharam mhetreकृषी उत्पन्न बाजार समिती
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भरतशेठ गोगावले समोरच मनीष काळजे व मनोज शेजवाळ यांच्यात राडा ; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

Next Post

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट ; संशयित महिलेला तीन दिवसाची पोलीस कोठडी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट ; संशयित महिलेला तीन दिवसाची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1976376
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group