Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर महापालिका प्रशासनाचा राजकारण्यांशी मेळ लागेना आणि खेळाडूंना इंदिरा गांधी पार्क स्टेडियम खेळायला मिळेना ; व्यथा खेळाडूंची

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 October 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले महापालिकेचे सोलापूरचे भूषण असलेले इंदिरा गांधी पार्क स्टेडियम गेल्या तीन वर्षापासून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट च्या नावाखाली बंद होते परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वीच क्रिकेट साठीचे मैदान तसेच स्टेडियम काही प्रमाणात अद्यायावत करण्यात आले असून महापालिकेच्या नवीन नियमाप्रमाणे केलेली भाडेवाढ प्रमाणे क्रिकेट मैदानाचे आगाऊ भाडे भरून देखील क्रिकेटच्या स्पर्धेसाठी महापालिकेकडून मैदान उपलब्ध केले जात नसून राजकारणी मंत्र्यांचा दौऱ्याचे निमित्त देऊन क्रिकेट स्पर्धेला स्टेडियम मैदान देण्यासाठी चालढकल होत आहे.


सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षाखालील मुलींच्या सामन्यांकरिता कोणतेही भाडे न घेता मैदान उपलब्ध करून दिले गेले होते. तेव्हा तीन ते चार सामने पार पडले, परंतु त्याच महिन्यात एक ओपन टूर्नामेंट संदर्भात महापालिकेला पत्र व्यवहार करून रितसर भाडे भरायची तयारी दाखवून स्पर्धेसाठी मैदान मिळण्यासाठी तसा अर्ज केला असता स्पर्धेच्या घोषित (२९) तारखे पूर्वी एक दिवस आधी परवानगी मिळाली, आणि त्याच अनुषंगाने सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन देखील स्पर्धा खेळविण्यासाठी संमती देत लेखी परवानगी दिली परंतु इतक्या कमी वेळात 8 दिवस चालणाऱ्या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन करणे अशक्य असले तरी आयोजकांकडून स्पर्धेच्या आठ दिवसाचे रितसर आगाऊ भाडे भरून स्पर्धेसाठी पुढील तारीख मिळावी म्हणून पुन्हा एकदा अर्ज करण्यात आला होता. व त्या पत्रव्यवहारा संदर्भात क्रीडा अधिकारी यांच्याशी तसेच आयुक्त व उपायुक्त श्री घोलप यांच्याशी संपर्क वारंवार संपर्क केला असता नवीन पालकमंत्री येणार आहेत, दसरा आहे अशी कारणे देऊन सहा तारखे नंतर स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून देऊ असे सांगण्यात आले होते.


महापालिकेने भाडे स्वरूपात आगाऊ रक्कम भरून घेतलेल्या पावतीवर (पावती क्रमांक 17224 तारीख 7 ऑक्टोबर 2022 नामे विशाल कुलकर्णी) मुख्यमंत्री यांचा सोलापूर दौरा निश्चित झाल्यानंतर तारीख कळविण्यात येईल* असे लिहून नूतन क्रीडा अधिकारी यांनी वाढीव मैदान भाडेवाढ GST सकट स्वीकारली असून तीन वर्षांनी उपलब्ध झालेले अतिशय सुंदर रित्या तयार केलेल्या मैदानावरती क्रिकेट खेळण्यापासून खेळाडूंना वंचित ठेवले आहे.


सोलापूर महापालिकेने पूर्वीचे क्रीडा अधिकारी यांची बदली करून त्यांचे जागी कोणत्याही क्रीडा प्रकाराचे ज्ञान नसलेले नवीन व्यक्ती क्रीडा अधिकारी म्हणून नेमले असून त्यांना मैदान, स्पर्धा या संदर्भात कोणतेही सखोल अभ्यास नसल्याचे त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता दिसून येते. नूतन क्रीडा अधिकारी हे आयुक्त व उपयुक्त यांचे आदेशानुसार काम करताना दिसून येत असून उपयुक्त श्री घोलप यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असून भाडे भरून देखील स्पर्धेसाठी मैदान देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. 


महापालिका प्रशासनाने ठरविल्याप्रमाणे केलेली भाडेवाढ संदर्भात देखील यापूर्वी क्रिकेट संघटना व क्रिकेट क्लब यांनी आयुक्त यांचेशी संपर्क केला असता दोन वेळा भाडेवाढ कमी करण्यात येऊन ठरलेल्या भाड्यामध्ये मैदानातील कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील याबद्दल अद्यापि सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही. 


एकीकडे क्रिकेट संघटनेच्या स्पर्धांना विना भाडेतत्त्वावरती मैदान उपलब्ध करून देऊन खेळाडूंच्या उज्वल भवितव्यासाठी महापालिका कायम प्रयत्नशील राहील असे सांगून देखील आता स्पर्धेसाठी मैदान मिळत नाहीये व परवानगी मागितले असता मंत्री महोदय यांचा दौरा व इतर कारणे सांगितले जात आहेत.


एकीकडे महापालिकेची अवस्था बकाल असून कित्येक कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत, त्या अभावी बस सेवा कोलमडली असून कित्येक विभागातील कर्मचाऱ्यांना दर महिना पगार मिळत नाहीये त्यातच आता स्मार्ट सिटी कडून इंदिरा गांधी पार्क स्टेडियम ची देखभाल करण्यासाठी मक्तेदाराला नेमण्यात आले असून मैदान देखभालीचा रोजचा खर्च अफाट आहे. 

स्पर्धा आयोजकांकडून महापालिकेला रीतसर भाडे भरलेले असून महापालिकेच्या तिजोरीत 66 हजार रुपये ची भर पडलेली असून याच माध्यमातून मैदानाच्या स्टेडियमची देखभालीची व्यवस्था होणे गरजेचे आहे.


सोलापुरात असलेले प्रतिथयश खेळाडू तसेच उदयोन्मुख खेळाडू यांना नव्याने तयार केलेल्या मैदानावरती त्यांचा खेळ बहरावा व चांगले क्रिकेट सामने स्पर्धा खेळण्यास मिळाव्यात या अनुषंगाने सोलापुरातील क्रीडा संघटना अशा स्पर्धा आयोजित करण्याकडे जास्तीचा कल असतो परंतु सध्या महापालिका प्रशासन हे राजकारण्यांच्या कात्रीत पुन्हा एकदा सापडल्याचे दिसून येत आहे.


स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून मैदानाची दुरुस्ती देखभाल करताना यापुढे राजकीय सभा समारंभ यासाठी इंदिरा गांधी पार्क स्टेडियम देणार नाहीत असा जो ठराव केला गेला होता त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते व त्यातच गेल्या सहा महिन्यापूर्वी अतिशय सुंदर रीतीने हिरवेगार मैदान पाहून प्रत्येक क्रिकेट खेळाडूला या मैदानावर लवकरात लवकर सामने व्हावेत खेळायला मिळावेत या अनुषंगाने तयारी करण्यासाठी कधी एकदा मैदानात बॅट बॉल घेऊन येतो असे झाले होते.


आयुक्त रजेवर असताना उपायुक्त घोलप यांच्याशी संपर्क केला असता ज्या स्पर्धेकरिता आयोजकांनी भाडे भरले आहे ती स्पर्धा आता महापौर चषक झाल्यानंतर घ्या असे सांगून टाळाटाळ करण्यात आली आहे. 

अधिक माहिती घेतली असता असे कळते की महापौर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिका स्पॉन्सर म्हणून 8 लाख रुपये आणि स्पर्धा खेळण्यास मैदान फुकट देणार असून सोलापूर महापालिकेच्या महापौर चषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडताना पाहावयास मिळत आहे. यापूर्वी सोलापुरची महाराष्ट्रात नावाजलेली महापौर चषक स्पर्धा ही खो खो, कबड्डी, हँडबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल या क्रीडा प्रकार मध्ये होत होती परंतु आता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम हे आता केवळ क्रिकेट स्पर्धेसाठी द्यायचे ठरविले असून इतर खेळांसाठीचे मैदानी अदययावत करण्याचे काम सुरू आहे, परंतु जर महापौर चषक क्रिकेट स्पर्धेसाठी महापालिका आठ लाख रुपये प्रायोजक म्हणून देणार असेल तर इतर खेळा प्रकारांसाठी देखील महापौर चषक स्पर्धा आयोजित करणार का?


महापौर चषक क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्थानिक क्रिकेट स्पर्धा झाल्यास महत्त्वाच्या महापौर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना खेळाडूंना सरावाचा फायदा होईल तसेच नव्याने तयार करण्यात आलेली खेळपट्टी चा अंदाज व मैदान, स्टेडियम मधील कोणत्या गोष्टी कमी जास्त प्रमाणात कशाप्रकारे वापरण्यात येतील याचा अंदाज लागणे गरजेचे आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेकडून भविष्यात भारतीय क्रिकेट नियमित मंडळाकडून आयोजित होणारे चांगले सामने सोलापुरात भरविण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि त्या अनुषंगाने खेळपट्टी सजीव आणि वापरात राहावी तसेच स्टेडियममधील गोष्टींचा उपयोग झाला पाहिजे व त्याकरिता जास्तीत जास्त स्पर्धा होणे गरजेचे आहे.

कोणतीही स्पर्धा न होता मैदानाच्या देखभालीचा खर्च हा महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडणार असून स्पर्धा आयोजकाने भरलेल्या भाड्यातून देखभालीचा खर्च करता येणार आहे.


इंदिरा गांधी पार्क स्टेडियम अदययावत होऊन सहा महिने झाले असून तरी देखील अद्यापी एकही अधिकृत स्पर्धा येथे पूर्ण झालेली नाही की कोणत्या क्रिकेट  क्लब ना खेळण्यासाठी मैदान, सरावाची खेळपट्टी की इतर साहित्य उपलब्ध झालेले नाही.


महापालिका उपायुक्त घोलप हे क्रिकेट विरोधी काही लोकांना हाताशी धरून जाणून बुजून ही स्पर्धा होऊ न देण्याचा घाट घालत असून उद्घाटनाच्या नावाखाली मैदान उपलब्ध करून न देणे असे प्रकार बंद करून लवकरात लवकर स्पर्धेला मैदान उपलब्ध करून न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हा परिषद परिसरात दिवसभर घुमला घंट्याचा नाद ; शेतकऱ्यांचा हा आहे प्रश्न ; अगोदर मोजणी मगच रस्त्याचे काम…..

Next Post

नमामी चंद्रभागा उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर सुविधांचा आराखडा सादर करा ; सिईओ दिलीप स्वामी यांच्या सूचना ; काय काय सुविधा आहेत या आराखड्यात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नमामी चंद्रभागा उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर सुविधांचा आराखडा सादर करा ; सिईओ दिलीप स्वामी यांच्या सूचना ; काय काय सुविधा आहेत या आराखड्यात

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002518
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group