सोलापूर : शहर उत्तर मतदारसंघात पुन्हा एकदा महापालिकेच्या तोंडावर भाजपला गळती लागली असून भाजपचे संघटन सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष सोडल्यानंतर आता भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या शुक्रवार पेठ भागातून भाजपचे तळागाळात काम करणारे, प्रत्येक महापालिका निवडणुकीत भाजपची बूथ यंत्रणा सक्षमपणे हाताळणारे, युवा नेते संदीप उर्फ बंटी बेळमकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.
महापालिकेवर भगवा फडकवून ,हिंदुत्ववाचा नकली ढोंग करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
यावेळी पक्षप्रवेश शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब, त्यांच्या उपस्थितीत झाला यावेळी शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्र, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, महेश धाराशिवकर, अतुल भवर व शिवसैनिक उपस्थित होते.

















