सोलापूर : एमआयडीसी भागातील सुनील नगरात राहणाऱ्या 31 वर्षीय तामिळनाडूच्या युवकाचा रविवारी रात्री खून झाला आहे. तिक्ष्ण हत्याराने वार करून मारेकरी फरार झाले होते, त्याला रात्री दहाच्या सुमारास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते उपचार सुरू असताना मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मारेकऱ्यांपैकी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
कल्याणी काटूराजा देवर (मूळ राहणार, अरियापट्टी, चेलमपट्टी, मदुराई, तामिळनाडू) असे मयत युवकाचे नाव आहे. हे कुटुंब तामिळनाडू येथून येऊन सोलापुरातील एमआयडीसी भागातील सुनील नगर येथे पापड व्यवसाय करीत होते, दरम्यान त्यांच्याच नात्यातील इसमानी त्याचा खून केल्याचा आरोप मयताचा भाऊ राजेश याने करत अधिक माहिती दिली….

















