सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांच्यावतीने दिवाळी सणानिमित्त दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन करण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आले होते या निवेदनात म्हटले होते की,
भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा दिवाळी सण २१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर पर्यंत आहे. दरवर्षी शासनाकडून वेतन दिवाळी पूर्व वितरित करण्याचे आदेश प्राप्त होतात. परंतु या वर्षी आजतागायत असे आदेश निर्गमित झाले नाहीत. अदयाप सण अग्रीम मिळालं नाही. युनियनच्या वतीने दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सण अग्रीमात २५००० रूपये वाढ करण्याबाबतचे निवेदन देण्यात आलेले होते, बोनस, वाढीव सण अग्रीम व आगाऊ वेतन दिवाळी पूर्व नसल्यानं कर्मचाऱ्यांना दिवाळी उत्साहात साजरा करण्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. तरी आपणास विनंती करण्यात येते की, ऑक्टोबर २२ चे वेतन दिवाळी पूर्व करण्यास विनंती आहे. कर्मचान्याची दिवाळी आनंदात व उत्साहात साजरा करता येईल तरी तातडीने निर्णय होण्यास विनंती आहे.
एकूणच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला महत्त्व देत राज्य सरकारने तातडीने शासन निर्णय काढून माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्यात काढण्याऐवजी दिवाळीपूर्वीच देण्यात यावे असा जीआर राज्याच्या वित्त विभागाने काढला. त्यामुळे दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता जीआर काढला मात्र वेतन कधी मिळणार याकडे कर्मचाऱ्यांचा नजरा लागल्या आहेत.




















