सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे जिल्हा परिषद मुख्यालय , पंचायत समिती उत्तर, दक्षिण, यशवंत नगर वसाहत मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना दिवाळी फराळ साहित्य व सुगंधी वस्तूंचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पंडित भोसले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्य सरचिटणीस विवेकानंद लिंगराज यांनी तर सूत्रसंचालन डॉ.एस. पी. माने तर आभार प्रदर्शन राकेश सोडी यांनी मानले.
सदरचा कार्यक्रमात 30 मुख्यालय स्तरावरील , दक्षिण सोलापूर ,उत्तर सोलापूर कडील 11 सुरक्षा व स्वच्छता रक्षक अशा 41 कर्मचाऱ्यांना सदरचा किट जिल्हा परिषदेमध्ये प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजीव गाडेकर, त्रिमूर्ती राऊत, श्रीशैल देशमुख, श्रीधर कलशेट्टी, संतोष शिंदे,नवनाथ वास्ते, संतोष शिंदे, विशाल घोगरे, चेतन भोसले, कैलास जिंदे, आदींनी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका मांडत असतेच परंतु त्याही पलीकडे जाऊन आपले सामाजिक दायित्व सुद्धा पार पाडत असते. कोविड काळात सुद्धा कर्मचारी युनियनच्या माध्यमातून चांगले काम झाले आहे. आजही कंत्राटी सफाई कामगारांना दिपावली निमित्त फराळाचे साहित्य देऊन त्यांची दिपावली गोड केली आहे.
-मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी.


















