सोलापूर : अवंती नगर, वसंत विहार, बाळे नाला हा दुपारपासून ओव्हरफ्लो होऊन याचे पाणी गणेश नगर, आर्यनंदी, यश नगर भाग २ येथे जाण्यास सुरुवात झाल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, विभागीय अधिकारी व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी क्रमांक ६ महेश क्षिरसागर, जे.ई सावंत, गायधनकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळेस देवेंद्र कोठे यांनी सर्व बाबी निदर्शनास आणून दिली तसेच ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे जास्त धोका आहे अशा नागरिकांना शिफ्टिंग करण्यासाठी सोमपाच्या २७ नंबर शाळा व देवेंद्र कोठे यांनी राज मेमोरियल इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिफ्टिंगची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. परिसरातील सर्व धोकादायक असलेले रस्ते बॅरिकेटिंग द्वारे बंद करण्यात येत आहेत.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की मौल्यवान वस्तू कागदपत्र तसेच धान्य अशा सर्व बाबी वरचा मजल्यावर अथवा सुरक्षित स्थळी शक्य असले तर ते हलवावे. लहान मुले व वयोवृद्ध लोकांना मोठ्या परिसरात जाऊ देऊ नये अशी आवाहन करण्यात आले.



















