सोलापूर : सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे यांनी दिवाळीच्या फराळा निमित्त पत्रकारांना आपल्या कार्यालयात बोलावले होते. यावेळी दिलीप कोल्हे यांचा विषय निघाला असता भाऊ हे राष्ट्रवादीचेच आहेत आणि राष्ट्रवादीतच राहणार, एक बहीण म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दरम्यान नेमक्या काय म्हणाल्या विद्या लोलगे पहा…



















