Thursday, September 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोक्का व खून खटल्यातील साक्षीदारावर प्राणघातक हल्ला, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 October 2023
in solapur
0
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-माळशिरस येथील नाना आसबेचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणातील साक्षीदारावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या साजिद इब्राहीम सय्यद रा.अकलूज याचा जामीन अर्ज माळशिरस येथील मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश कारंडे यांनी फेटाळला.

यात हकिकत अशी की, सन २०१६ मध्ये देवकर खून खटल्यातील नेत्र साक्षीदार नाना आसबे याचा प्रदिप माने,देवा जाधव,रमेश धुळे,दशरथ विठोबा माने, अतुल गोरख इंगळे,राजु मधुकर भोसले,साजिद इब्राहिम सय्यद, सचिन दामोदर एकतपुरे, सागर प्रताप मोहिते या लोकांनी कट रचून खुन केल्याने त्यांचे विरुद्ध खुनाच्या व मोक्काच्या आरोपाखालील खटला माळशिरस सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.त्या खटल्यामध्ये गणेश सदाशिव भोसले हा महत्वाचा साक्षिदार आहे. सदर केसची नियमित सुनावणी सुरू होणार आहे असे असताना रोहित राजु भोसले व सचिन दामोदर एकतपुरे हे लोक नाना आसबे खुन केसमधील साक्षिदार आहेस तू त्यास जास्त क्राँस करू नको, वकील देवु नको असे म्हणुन दबाव टाकत होते. तसेच रोहित राजू भोसले हा माझे वडीलांचा जामिन होवु दे असे दबाव टाकत होता.

दि.24/08/2023 रोजी  फिर्यादी गणेश भोसले,किशोर उर्फ पिटु आसबे, सुनिल इंगळे,आत्माराम पवार, शंकर भिताडे व इतर दोन ते तीन लोक माळशिरस कोर्टात तारीख असल्याने गेले होते. सदर ठिकाणी केसमधील आरोपीचे बाजुचे अतुल इंगळे, नागेश उर्फ गोपी इंगळे, दामोदर एकतपुरे, निखील दामोदर एकतपुरे, सागर प्रताप मोहिते, देवा जाधव याचा भाऊ असे लोक आले होते. कोर्टामध्ये सदर केस ही पुढील महिण्याचे 1 तारखेपासून सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे केस सुरू होणार असल्याने वरील लोक नाराज झाले होते व रागाने पहात होते. फिर्यादी हा कोर्टाचे काम संपवुन दुपारी अकलुज येथे घरी आला. त्यानंतर रात्री 8.30 वा. चे सुमारास जेवण करून पान खाण्यासाठी अशोक चौक येथे आला व पान खावुन आयसीआयसीआय बँकेसमोर जाऊन थाबला व त्यानंतर फिर्यादी हा मोटार सायकलवरून घराकडे निघाला असता त्यावेळी संग्रामनगर ओलांडुन रात्री 9.30. वा. सुमारास पुढे आला असता पाठीमागुन एक मोटारसायकलवर 03 इसम आले व त्यांनी थांबविले त्यावेळी रस्त्यावरील लाईटचे व मोटारसायकलचे लाईटचे उजेडात पाहिले असता, त्यांचेपैकी एक रोहित राजु भोसले असल्याचे  पाहिले व इतर दोन अनोळखी होते, त्यांचे हातात लोखंडी कोयते होते. त्यापैकी रोहित भोसले याने  तु नाना आसबे खुन केसमध्ये लय मस्ती करतोय, कोर्टात जातोय, माझे वडीलांना जामिन होवु देत नाही, तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणुन त्या तिघांनी त्याचे हातातील कोयत्याने डोकीत, दोन्ही हातावर, तोंडावर, डावे पायावर सपासप वार केले त्यामुळे रक्तबंबाळ होवुन मोटार सायकल सोडुन काही अंतर जावुन खाली पडला. त्यावेळी  खाली पडल्यावरही तिघांनी  दोन्ही हातावर, डोकीत कोयत्याने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीचे हाताचे तीन तुकडे झाले व नाक कापून निघाले व डोक्यात व शरीरावर अनेक गंभीर जखमा झाल्या.त्यानंतर फिर्यादीने मोठमोठ्याने आरडा ओरडा केल्यावर  मित्र विक्रम कांबळे, आत्माराम पवार हे लोक पळत येत असल्याचे पाहुन रोहित भोसले व त्याचे सोबतचे दोन अनोळखी इसम हे तेथुन त्यांचे मोटार सायकलवरून तेथुन निघुन गेले तरी  जिवे ठार मारण्याची सुपारी देणारे 1) प्रविण उर्फ पपु भोसले, 2) अतुल उर्फ पिंटु मोहिते, 3) साजिद इब्राहीम सयद4) आदित्य मोहिते, 5) नितीन एकतपुर, 6) अतुल उर्फ भैया इंगळे 7) नागेश उर्फ गोपी इंगळे सर्व रा. अकलुज ता. माळशिरस  प्रत्यक्ष जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे 8) रोहित राजु भोसले रा. अकलुज ता. माळशिरस व 9) अनोळखी दोन इसम यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद गणेश सदाशिव भोसले याने अकलूज पोलीस स्टेशन येथे दाखल केली.

यात अटकेतील आरोपी साजीद सय्यद याने माळशिरस येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. 

यात मूळ फिर्यादी तर्फे व सरकारी वकिलांनी युक्तिवाद  करताना खून व मोक्क्याच्या गंभीर खटल्यातील मुख्य साक्षीदारास त्याचा पुरावा कोर्टासमोर येण्यास रोखण्यासाठी त्याचेवर प्राणघातक हल्ला झालेला असल्याने आरोपी जामिनास पात्र नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

यात मुळफिर्यादीतफे अँड. संतोष न्हावकर अँड धर्यशील भोसले यांनी सरकार पक्षातर्फे अँड. संग्राम पाटील यांनी तर आरोपीतफे अँड. शारपू शेख  यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी घेतला रुग्णालयातील मृत्यूंचा आढावा ; ही आली माहिती समोर

Next Post

सोलापुरात खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999589
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group