सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा येत्या 1 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी प्रसिद्धी पत्रक देत मोठा दावा केला आहे. पहा ते काय म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांचा प्रवेश येत्या मंगळवारी एक तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये प्रवेश होणार असून. .त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी हे सुद्धा प्रवेश करणार आहेत.भविष्यात अनेक विरोधी पक्षातले नेते हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. त्यांचा सुद्धा प्रवेश त्यानंतर घेतला जाईल यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, या पक्षातील महत्त्वाचे मोठे पदाधिकारी हे पुढील काही दिवसांमध्ये प्रवेश करतील….महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये बाळासाहेबांचं शिवसेना एक नंबरचा पक्ष असेल आम्हाला असा विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या प्रमाणे विरोधकाला आम्ही औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. त्या पद्धतीने आम्ही सर्व बाळासाहेबांचे शिवसेना पदाधिकारी तयारीला लागलो आहोत…


















