सोलापूर : ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी सरसकट पन्नास हजार नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांचे पीक कर्ज व विज बिल माफ करा, पिक विम्याची रक्कम तात्काळ द्या, खरडून गेलेल्या जमिनीला तात्काळ नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सोलापूर व जिल्ह्याच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, प्रदेश सचिव नलिनी चंदेले, जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, शहराध्यक्ष सुनीता रोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष राजश्री ताड, लता फुटाणे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष माया जाधव, बिस्मिल्ला शिकलगार, प्रतीक्षा चव्हाण, सिया मुलाणी, मनीषा माने यांच्यासह शहर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी कविता म्हेत्रे व विद्या लोलगे यांनी राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली..



















