सोलापूर शहरात बर्ड फ्लूची लागण ; कोंबडीचे मांस खात असाल तर थोडे सावध रहा
सोलापूर : सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून शिक्षण मध्ये जीवघेणा आजार असलेला बर्ड फ्लू या रोगाने सोलापूर शहरात शिरकाव केलेला आहे. त्यामुळे कोंबडीचे मटण जे लोक खातात त्यांनी सावधान राहावं असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
शहरातील छत्रपती संभाजी तलाव ईलाबाद परिसर मध्ये कावळे धार आणि बगळा हे पक्षी अचानक मृत्युमुखी पडले सुमारे 100 कावळे या परिसरात मरण पावल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे त्या मृत पक्षांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता त्याचा अहवाल बर्ड फ्लू या रोगाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने या परिसरातील दहा किलोमीटरच्या परिसरात सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या असून दहा किलोमीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित केले आहे.