सोलापूर : राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्रातील 23 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त (असंवर्ग) या संवर्गातील पदांवर पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे त्यामध्ये सोलापूरच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांना पदोन्नती मिळाली असून पोलीस उपायुक्त पदावर त्यांची बदली झाली असून नवी मुंबई डायल 112 या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली आहे.
मागील दोन ते अडीच वर्ष डॉक्टर प्रीती टिपरे यांनी सोलापुरात अतिशय चांगल्या पद्धतीने गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त पदावर काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाचा उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्काराचा समावेश आहे.



















