सोलापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी गटनेते चेतन नरोटे, सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, रियाज हुंडेकरी, गणेश डोंगरे, हेमा चिंचोळकर यांची उपस्थिती होती.
दरम्यान पत्रकार परिषदेत आमदार शिंदे यांनी अधिक माहिती देताना सोलापूर शहर व जिल्ह्यातून किमान 15 हजाराहून अधिक कार्यकर्ते जाणार असल्याचे त्यांनी सांगितले..



















