Saturday, June 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एंजलवनच्या सहकार्याने राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे भव्य नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 March 2025
in Social
0
एंजलवनच्या सहकार्याने राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे भव्य नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एंजलवनच्या सहकार्याने राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे भव्य नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ

सोलापूर (प्रतिनिधी) एंजलवनच्या सीएसआर निधीतून राह फाउंडेशनच्या अंतर्गत सेवा फाउंडेशन, सोलापूर सेंटरच्या ६वी, ७वी आणि ८वी बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणपत्र वितरण समारंभ व नोकरी मेळाव्याचे आयोजन समाज कल्याण हॉल, सोलापूर येथे करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश होता.

समर्थ कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना संपूर्ण ज्ञान, संवाद कौशल्ये आणि रोजगारक्षमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी दिशा देणे हा होता. प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रसिद्ध वर्तमानपत्राचे उपसंपादक आणि मुख्य अतिथी  भरतकुमार मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी एंजलवन कंपनीच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानण्यात आले.

या नोकरी मेळाव्यात सोलापूर शहरातील प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ग्रे व्हाईट, सिसूर सृष्टी एंटरप्रायजेस आणि ओला इलेक्ट्रिक व्हेइकल्स या प्रमुख कंपन्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीच्या संधी देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे आयोजन राह फाउंडेशनचे शुभम खरात (सिनीयर मॅनेजर, स्किल डेव्हलपमेंट),  अश्विन साखरे आणि अंतर्गत सेवा फाउंडेशनचे  विवेक यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती मनिषा वाघमारे यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर संपूर्ण सूत्रसंचालन मानसी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शीतल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या उपक्रमात एकूण ६५ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी ४७ विद्यार्थ्यांची पूर्वनियोजित यादी तयार झाली आणि ३२ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या. राह फाउंडेशन आणि एंजलवन यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षण आणि रोजगार यामधील दरी कमी करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमामुळे युवकांना करिअरसाठी महत्त्वाच्या संधी उपलब्ध झाल्या.

भरतकुमार मोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना एंजलवन कंपनीच्या मदतीने सोलापूर सेंटर उभारण्यात आले असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे सांगितले.

राह फाउंडेशनचे शुभम खरात यांनी विद्यार्थ्यांना जोहरी खिडकी आणि इकिगाई संकल्पनांद्वारे आत्मविश्लेषण करून योग्य करिअर निवडण्याचे आवाहन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच  निखिल यांनी ग्रे नाईट कंपनीविषयी माहिती देऊन संवाद कौशल्ये आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेलसारख्या तांत्रिक कौशल्यांच्या गरजेवर भर दिला. सनसूर सृष्टी खादी ग्रामोद्योग चे  अब्बास यांनी आपल्या कंपनीविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मुलाखतींसाठी संधी दिली. तसेच ओला इलेक्ट्रिक व्हेइकल्स शोरूमचे आदित्य यांनीही आपल्या कंपनीविषयी माहिती देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे. राह फाउंडेशन भविष्यातही अशाच प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

Tags: @सोलापूरAngel oneRah faundetion
SendShareTweetSend
Previous Post

सुभाष देशमुख यांचा लाडका सचिन झाला शिवसेनेचा सोलापूर शहर प्रमुख ; अनेकांना राजकीय धक्का

Next Post

सोलापुरात कर्मचारी संघटनांची वज्रमुठ..! जिल्हा परिषद गेटवर धरणे आंदोलन, घोषणांनी परिसर दणाणला.!

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981995
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group