Friday, June 20, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Breaking : सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया एक महिन्यात संपवा ; उच्च न्यायालयाचे निर्देश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 March 2025
in Co -operative
0
Breaking : सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया एक महिन्यात संपवा ; उच्च न्यायालयाचे निर्देश
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Breaking : सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया एक महिन्यात संपवा ; उच्च न्यायालयाचे निर्देश

सोलापूर : सोलापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या स्टेजवरून स्थगित करण्यात आली होती आणि नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या होत्या. पण त्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपील वर निकाल देताना एका महिन्यात आहे त्या स्थितीवरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

31 डिसेंबर 2024 रोजी राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने नवा अध्यादेश काढून या सूचना केल्या आहेत त्यामध्ये,
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेली अंतिम मतदार यादी दि.०१.०६.२०२४ अखेरच्या दिनांकास धरुन केलेली असल्याने, सदर मतदार यादीस दि.०२.१२.२०२४ रोजी ०६ महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचा दि.०१ जानेवारी, २०२५ पासून आहे त्या टप्यावर सुरु होणारा निवडणूक कार्यक्रम स्थगित करुन नव्याने प्रारुप मतदार यादी तयार करुन सुधारीत निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा असे सूचित करण्यात आले होते.

दरम्यान या स्थगिती आदेशाच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी येथील विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक बसवराज माळगे, राष्ट्रवादी अजित गटाचे बसवराज बगले यांच्यासह इतर हे उच्च न्यायालयात गेले होते.

त्याची सुनावणी होऊन बुधवारी सकाळी उच्च न्यायालयाने निकाल देताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे त्या स्थितीतून पुढे एका महिन्यात पूर्ण करावी असे निर्देश दिले आहेत. मार्च एंड च्या नावाखाली मलई खाण्याचा बाजार समितीच्या प्रशासकाचा डाव आता हाणून पाडण्यात आल्याची अशी चर्चा रंगली आहे.

माजी आमदार दिलीप माने दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यासह माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, बसवराज बगले यांची आता भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: @सोलापूरबाजार समिती निवडणूकसहकार
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात मराठा समाज झाला प्रचंड आक्रमक ; तर धनंजय मुंडेला…..

Next Post

सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदावरून मोहन निंबाळकर यांची उचलबांगडी  ; पदभार दिला या अधिकाऱ्याकडे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
Breaking : सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया एक महिन्यात संपवा ; उच्च न्यायालयाचे निर्देश

सोलापूर बाजार समितीच्या प्रशासकपदावरून मोहन निंबाळकर यांची उचलबांगडी  ; पदभार दिला या अधिकाऱ्याकडे

ताज्या बातम्या

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

19 June 2025
गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

19 June 2025
ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

19 June 2025
कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

18 June 2025
शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

18 June 2025
महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

18 June 2025
शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

17 June 2025

क्राईम

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1771595
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group