सोलापुरात मराठा समाज झाला प्रचंड आक्रमक ; तर धनंजय मुंडेला…..
सोलापूर प्रतिनिधी.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्वरित फाशी देण्यात यावी .यामध्ये धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा. त्यांची आमदारकी रद्द करावी. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे.
मंगळवारी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती. यावेळी पवार हे बोलत होते.
यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकाऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण लढा कायम चालू ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान म्हणाले, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड आणि सकल मराठा समाज हा कायम आंदोलन करत राहील जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उग्र आंदोलन करायची आमची तयारी आहे याची सरकारने दखल घ्यावी असा इशाराही बागवान यांनी दिला आहे.
यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, महादेव गवळी, गणेश डोंगरे, गणेश देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड मतीन बागवान , शफिक राजभरे, राजू हुंडेकरी, कायुंम मोहोळकर, हरीस शेख, माजीद बागवान,जैद भगवान, रेहान बागवान, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, माजी नगरसेवक विनोद भोसले, एल.जी. गायकवाड, सदाशिव पवार, लता फुटाणे, उज्वला साळुंखे, शोभना सागर, लता ढेरे,, विजयाताई काकडे, मीनल दास, जयश्री जाधव, सुनिता नागणे आधी सह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.