सोलापूर शहर महिला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा तानाजी सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, दिलीप कोल्हे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश राष्ट्रवादीच्या अनेक प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी हातातील घड्याळ उतरून शिवसेनेची ढाल तलवार हातात घेतली.
प्रवेश करताच त्यांना पदावर नियुक्ती देण्यात आली. सुनंदा साळुंके सोलापूर महिला आघाडी जिल्हाउपप्रमुख, मनीषा नलावडे सोलापूर महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख, जयश्री पवार सोलापूर महिला आघाडी शहरप्रमुख, मारता आसादे सोलापूर महिला आघाडी शहर उपप्रमुख, शोभा गवळी सोलापूर महिला आघाडी शहर उपप्रमुख यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, उपजिल्हाप्रमुख राजकुमार शिंदे, बाळासाहेब निकम, शशीकांत शिंदे, सर्व पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.





















