Friday, April 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अरे बाबा ! सालार यांचा अजिदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ; पक्षाची ताकद मुस्लिम समाजात वाढविणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 March 2025
in political
0
अरे बाबा ! सालार यांचा अजिदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ; पक्षाची ताकद मुस्लिम समाजात वाढविणार
0
SHARES
642
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अरे बाबा ! सालार यांचा अजिदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ; पक्षाची ताकद मुस्लिम समाजात वाढविणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचै विकासात्मक धोरण अल्पसंख्यांक वंचितांना न्याय देण्याची त्यांची भुमिका यावर प्रभावित होऊन युवा नेते बाबा सालार यांनी राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत नई जिंदगी येथे शेकडो समर्थकासह मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश नई जिंदगी भागात झाला.

बाबा सालार यांनी पक्ष प्रवेश केल्याने त्यांचा पक्षाला फायदा होणार असून या आजूबाजूच्या सर्व प्रभागांमध्ये त्यांची मदत होईल येणार्या महानगरपालिकेला निवडणुकीत आम्ही मिळून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणू अशी ग्वाही अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख यांनी दिली.

यावेळी बोलताना बाबा सालार यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी व माझे सर्व सहकारी प्रामाणिकपणे काम करून चांगला रिजल्ट देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

बाबा यांचे समर्थक सोलापूर शहरभर असून त्यांचे पक्षात येण्याने अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून येण्याकरिता त्यांचे सहकार्य लाभेल असे मत कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केले.

या भागातील प्रभागांमध्ये बाबा आणि अमीर शेख जो काही निर्णय घेतील त्या निर्णया सोबत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू मत प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केले

अल्पसंख्यांक समाजाचा विकास करणे समाजातील प्रश्न मार्गी लावणे याकरिता बाबा सालार यांना ताकद देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईल आज आमदार इद्रीसभाई नाईकवाडी बाबा सालार यांच्या पक्ष प्रवेशास अजितदादांचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे प्रतिनिधी म्हणून आज येथे या सोहळ्यात उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा सालार आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी मनःपूर्वक स्वागत करतो असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले

अध्यक्ष भाषणामध्ये आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वागीण विकास करीता अजितदादांनी केलेले काम आणि सोडवलेल्या समस्या तसेच शासन स्तरावर अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कासाठी मांडलेले प्रश्न, अल्पसंख्यांकाच्या अडचणीच्या काळामध्ये धावून आलेले प्रसंग याचा लेखाजोखा मांडला

बाबा सालार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी स्वागत करतो येणार्या काळामध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्न सोडवण्याकरिता त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता बाबा सालार यांना ताकद देण्याचा काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे आपण सर्वजण लोकांचे प्रश्न सोडवून पक्ष बळकट करण्याचे आवाहन देखील आमदार इद्रीसभाई नायकवाडी यांनी केले.

याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश सचिव शशिकांत कांबळे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख, समाजसेवक सेवक सत्तार शेख फिजाओद्दीन आबादिराजे, नासिर बागवान, जाविद मुल्ला, शकील भाई इनामदार, शब्बीर मेमन, इम्रान भाई सालार, बब्बू शेख रौफ अरब, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजू मोरे, नुतन अल्पसंख्यांक मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार, वाहतूक अध्यक्ष इरफान शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहाराज आबादिराजे,अल्पसंख्यांक दक्षिण अध्यक्ष अशपाक कुरेशी, दक्षिण संघटक जहीर शेख,प्रदीप बालशंकर, अनिल बनसोडे, सोमनाथ शिंदे, शामराव गांगुर्डे, आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते.

Tags: Ajit PawarBaba salarNai jindagiNCP Ajit PawarPolitical party
SendShareTweetSend
Previous Post

उत्तर तालुक्यात स्वराज्य सप्ताहातून राष्ट्रवादीची बांधणी ; उज्वला पाटील यांचे असे ही उपक्रम

Next Post

बांधवांनो लक्ष द्या ! अण्णाभाऊ साठे महामंडळ देणार थेट एवढे लाख कर्ज

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बांधवांनो लक्ष द्या ! अण्णाभाऊ साठे महामंडळ देणार थेट एवढे लाख कर्ज

बांधवांनो लक्ष द्या ! अण्णाभाऊ साठे महामंडळ देणार थेट एवढे लाख कर्ज

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1975585
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group