Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा शेतकऱ्यांनी केला दुग्धाभिषेक….!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट :  जिन्होने पुरे राज्य की गंदगी एक दिन मे निकाल दी.. उन्हे पाणी से क्या दूध से अभिषेक करना चाहिए..! हा डायलॉग हिंदी ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूरच्या बाबतीत शेतकऱ्यांनी उद्गारला होता.तोच अनुभव सोमवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी अक्कलकोट येथे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या बाबतीत अनुभवास मिळाला.

अक्कलकोट तालुक्याच्या सर्व मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा निधी मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास ३० कोटींचा निधी मिळाला. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने संपन्न झाली आणि याचा आनंद व्यक्त करण्यासाठी चपळगाव व कुरनूर येथील शेतकऱ्यांनी म्हेत्रे यांचा चक्क दुधाने अभिषेक केला.

अक्कलकोट तालुक्यात यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती.परंतु शासनाकडून केवळ किणी मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश होते.वास्तविक संपूर्ण तालुक्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते ही बाब माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली.अक्कलकोट तालुक्यातील सर्वच खरीप पिकांचे पंचनामे व्हावेत यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली. एवढ्यावरच न थांबता माजी मंत्री म्हेत्रे यांनी तात्काळ मुंबई येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन अक्कलकोट तालुका व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची १२५ टक्के रक्कम मिळावी यासाठी निवेदन सादर केले.आणि याचेच फलित म्हणून शासनाकडून अक्कलकोट तालुक्याला किणी मंडलाव्यतिरिक्त तब्बल ३१ कोटींचा निधी मंजूर झाला आणि ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना हा निधी मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.याचीच जाणीव ठेवून सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी चपळगाव आणि कुरनूर गावातील शेतकऱ्यांनी जवळजवळ १५१ लिटर दूधाने म्हेत्रे यांचा दुग्धाभिषेक केला.

यावेळी अशपाक बळोरगी,सभापती प्रथमेश म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील,सद्दाम शेरीकर,महेश जानकर,सलिम येळसंगी,शीतल ताई म्हेत्रे मल्लिकार्जुन काटगाव,बसवराज अळ्ळोळी,सिध्दार्थ गायकवाड,शिवप्पा कुंभार,रामु समाणे,वसंत देडे,हिळ्ळी सर,दिलीप काजळे,

यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चपळगाव येथील सिध्दाराम भंडारकवठे, धानप्पा डोळ्ळे,खंडप्पा वाले, सोमनाथ बाणेगांव,ब्रम्हानंद म्हमाणे,अविनाश इंगुले,बसवराज हन्नुरे,विजय कांबळे या शेतकऱ्यांकडुन तर कुरनुरमधील सरपंच व्यंकट मोरे,अयुब तांबोळी,सुरेश बिराजदार,दयानंद मोरे,अजय शिंदे,केशव मोरे,अप्पा शिंदे,संभाजी बेडगे, किशोर सुरवसे,स्वामीराव सुरवसे,लक्ष्मण शिंगटे,नारायण मोरे आदी शेतकऱ्यांनी हा दुग्धाभिषेक केला.

विरोधकांनी विटेवर वीट नाही ठेवली-व्यंकट मोरे(सरपंच,कुरनुर)

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दुधाने अभिषेक करण्यामागचा उद्देश व्यक्त करत असताना कुरनूर गावचे सरपंच व्यंकट मोरे यांनी विरोधी पक्षावर घनाघात केला.यावेळी व्यंकट मोरे म्हणाले की सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्याचा संपूर्ण विकास करण्यासाठी अनेक त्याग केले आहेत.कुरनूर धरण,एकरूख उपसा सिंचन योजना,मातोश्री-गोकूळ कारखान्याची निर्मिती यासह तालुक्याच्या संपूर्ण विकासासाठी मैत्री यांनी प्रयत्न केले असून विरोधकांनी मात्र विटेवर वीट ठेवली नाही असा आरोप केला.

नायक चित्रपटाची आठवण झाली; आयुष्याचे सार्थक झाले-सिध्दाराम म्हेत्रे

आज वरचा राजकारणात अनेक सत्कार स्वीकारले परंतु आजचा सत्कार लाख मोलाचा ठरला. जगाच्या पोशिंद्याकडून मिळालेला हा सन्मान हा फार मोठा आशीर्वाद आहे.शेतकऱ्यांनी केलेला दुग्धाभिषेक पाहून नायक चित्रपटातील अनिल कपूरची आठवण झाली.या पुढील काळात शेतकऱ्यांसाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चितपणे करणार असल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking : सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार अखेर निलंबित ; पहा आदेशात काय म्हटले

Next Post

सोलापूर : शिक्षणाधिकारी किरण लोहारसाठी कही खुशी, कही गम ; अखेर जामीन मंजूर ; काय झाला युक्तिवाद वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : शिक्षणाधिकारी किरण लोहारसाठी कही खुशी, कही गम ; अखेर जामीन मंजूर ; काय झाला युक्तिवाद वाचा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002482
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group