सोलापूर : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या जामीन अर्जावर आज रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.पांढरे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जामीन अर्ज सुनावणीच्या वेळेस अर्जदार आरोपीचे वकील एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवातात गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आलेला असून साक्षीदारांवर दबाव आणण्याचा कोणताही प्रश्न येत नाही तसेच आरोपी हा कोठेही पळून जाणार नाही असा युक्तिवाद मांडला,तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
यात सरकारी वकील म्हणून एडवोकेट शैलजा क्यातम यांनी तर आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे, एडवोकेट विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.


















