अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती शाखा सुलेरजवळगेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आओटीएस, एकरकमी परतफेड, सुलेरजवळगे सोसायटी सहभागी होणार असून थकबाकीदार सभासदांना कर्जमुक्त करण्याचा निर्धार सभासद शेतकरी व संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
याप्रसंगी तालुका सीनियर बँक इन्स्पेक्टर एस.एल कोरपे, सरपंच अंबादास देवकते, चेअरमन रविकांत बगले, स्वामी समर्थ सुतमील चे संचालक बसवराज बाके, माजी सरपंच फिरोजी शिंगाडे, माजी उपसरपंच देविदास कोळेकर, बँक इन्स्पेक्टर धानाप्पा बंथनाळे, शाखा अधिकारी सिद्धाराम वाडी ,सचिव रमेश कोटगी सोसायटी संचालक व्हन्नप्पा बिराजदार, मल्लिकार्जुन अष्टगे, राजकुमार बगले नागय्या स्वामी, विजयकुमार चव्हाण, श्रीमंत अर्जुन रेवणसिध्द टेंगळे, राहुल वाघमारे,धर्मराज बगले,म्हाळप्पा पुजारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुलेरजळगे सोसायटीच्या एकूण थकबाकीदार 76 सभासदाकडे 68 लाख 88,410 मुद्दल तसेच व्याज आकारणी मिळून सुमारे दोन कोटी रुपये एकरक्कमी योजनेत थकबाकीदार सभासदासाठी परतफेड करताना बँकेकडून व्याजदर 11 ऐवजी सात टक्के माध्यम मुदत कर्ज व्याजदर 13 ऐवजी नऊ टक्के असे करण्यात आले .
योजनेत सहभागी होण्यासाठी व्याजदरात देखील सवलत देण्यात आले आहे नवीन कर्ज योजनेत तीन लाख रुपये शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना मिळणार आहे..
दरम्यान या मेळाव्यातच अशोक वाघमोडे, नामदेव खुने या सभासदांनी परतफेड योजनेत लाभ घेतला.
दरम्यान, सोसायटीच्या या निर्धार मेळाव्यात ओटीएस एक रकमी परतफेड योजनेत सुलेरजवळगे सोसायटी सहभागी होणार असून थकबाकीदार सभासदांना कर्जमुक्त करण्याचा निर्धार सोसायटीच्या सभासद शेतकरी संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यापुढे सोसायटीच्या माध्यमातून रेशन दुकान तसेच दूधडेअरी सुरू करण्याचा मानस चेअरमन रविकांत बगले यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
याप्रसंगी सरपंच अंबादास देवकते यांनीही सोसायटीच्या माध्यमातून सभासदासाठी सुरू केलेली ही योजना कौतुकास्पद असल्याचा सांगताना संस्थेच्या माध्यमातून रेशन दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी तालुका सीनियर बँक इन्स्पेक्टर एस.एल.ल कोरपे यांनी आपल्या मार्गदर्शनात या योजनेत सहभाग नोंदवून सभासदांनी कर्जमुक्त व्हावे असे आवाहन केले.
प्रारंभी प्रास्ताविकात संस्थेचे सचिव रमेश कोटगी यांनी एकंदरीत संस्थेच्या थकबाकी आणि एकरकमी परतफेड योजनेचा लाभ यासंदर्भात सविस्तर माहिती दिली..
या निर्धार मेळाव्यास सोसायटीचे सर्व संचालक ग्रामपंचायतचे सदस्य सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















