सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुक्त कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची पुण्याला बदली झाली आहे. संतोष धोत्रे यांनी 14 महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला होता. धोत्रे यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.०, वसुधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे या पदावर झाली आहे.
मूळचे मोहोळ तालुक्यातील नरखेडचे रहिवाशी असलेले धोत्रे यांनी यापूर्वी सातारा, मंत्रालयात कदम यांच्याकडे पीएस, धुळे, जालना येथे काम केले आहे. सोलापुरात पदभार घेतल्यानंतर घरकुल योजनेला गती | दिली. त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जीवन्नोती अभियानाच्या माध्यमातून बचत गटाची चळवळ वाढविली.
कोरोना महामारीचा काळ असतानाही ऑनलाईनच्या माध्यमातून बचत गटाच्या उत्पादनाना त्यांनी नवे मार्केट मि ळवून दिले. त्याचबरोबर कर्जाची मर्यादा वाढविली. जलसंधारणाची कामे, समाजकल्याण योजनेला गती दिली. कोंबड्यावर आलेला रोग, जनावराच्या लम्पी आजार प्रतिबंधासाठी प्राधान्यक्रमाने काम करुन साथ नियंत्रणात आणली.




















