सोलापूर : जाई जुई नगर येथील संगीता हत्ती यांच्या घरी एक साप आल्याचे त्यांना निदर्शनास आले. तो साप बोअरच्या चेंबरमध्ये असलेल्या पाईप जवळ लपून बसला होता. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी WCAS चे सदस्य संतोष धाकपाडे यांना कळविले. धाकपाडे यांनी वाईल्डलाईफ केअरचे सदस्य गणेश तुपदोळे यांना घटनास्थळी पाठविले. सदर ठिकाणची पाहणी केली असता तो साप बोअरच्या पाईपमध्ये जाताना गणेश यांना दिसला.
साप बोअरच्या पाईपमध्ये गेल्यामुळे त्याला बचाव करणे अवघड झाले होते. कारण बोअरच्या पाईपची खोली साधारण दोनशे फूट खोल होती. गणेश यांनी धाकपाडे यांना फोन करून तेथील परिस्थितीची माहिती दिली. तो साप बोअरमध्ये गेला आहे आता त्याला कसं बाहेर काढायचे. बोअरमध्ये असलेला पंप बाहेर काढल्यावर तो साप बाहेर येईल असे धाकपाडे यांनी सांगितले.
साधारण दोन तासांच्या कठीण प्रयत्नानंतर त्या धामण सापाला बाहेर काढण्यात यश आले. दोरी बांधून पंप बोअरमध्ये सोडली असल्याने त्या सापाला बाहेर काढण्यात यश आले. त्या सापाला बाहेर काढल्यानंतर तिथल्या परिवाराने सर्पमित्रांचे आभार मानले. या बचाव कार्यात सर्पमित्र गणेश तूपदोळे सर्पमित्र वैभव कांबळे व सहकारी मित्र सिद्धू किंदगिरी यांचा सहभाग होता.


















