संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे ही मतमोजणी ही सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या हॉलमध्ये होत आहे. निवडणुका अधिकारी कुंदन भोळे यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू आहे.
भोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीच्या एकूण दोन फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीत आंबेचिंचोली, पुळूज 1, पुळूज 2, पुळूज 3, पुळूज 4, पुळूज 5, पुळुजवाडी, फुलचिंचोली 1, फुलचिंचोली 2, शंकरगाव, विटे, उचेठाण, ब्रह्मपुरी, औंढी, टाकळी सिकंदर 1, टाकळी सिकंदर 2, पेनुर 1, पेनुर 2, पाटकुल 1, पाटकुल 2, पाटकुल 3, वरकुटे, तांबोळे, सौंदणे, मगरवाडी, तारापूर 1, तारापूर 2 या गावांचा निकाल हाती येणार आहे.
सध्या वेगवेगळ्या रंगाच्या चिठ्ठ्या एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. मतमोजणी ला अद्याप सुरवात झाली नाही. निकाल लागण्यासाठी साधारणतः सायंकाळचे पाच वाजतील असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.


















