मोहोळ : भीमा सहकारी साखर कारखाना महाडिक गटाचा विजय झाल्यानंतर या रणधुमाळीतील मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या उमेश पाटील यांनी आपली जोरदार प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात, या निवडणुकीत आमच्या आघाडीचा विजय निश्चित होता. हा विजय आम्ही विनम्रपणे स्विकारतो.या विजयाचे श्रेय मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी सभासदांच्या सदसद्विवेकबुद्धी ला समर्पित आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी जुलमी,असंस्कृत,असभ्य,मुजोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेतृत्वाला झुगारून दिले आहे.
तालुक्याची,जिल्ह्याची व आमच्या पक्षाची मान शरमेने खाली घालवणा-या विकृत मनोवृत्तीच्या नेतृत्वाला मतदारांनी लोकशाही मार्गाने योग्य जागा दाखवली. भीमाची निवडणुक म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भावी निवडणुकांची लिटमस टेस्ट होती. या परिक्षेत आम्ही मुन्ना साहेबांच्या नेतृत्त्वात डिस्टिंक्शन मध्ये पास झालो आहोत.भविष्यातील सर्व निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना साक्षी ठेऊन हा “भीमा पॅटर्न” कायम राहील.



















