सोलापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील लिपीक राजू गाडेकर ,संजय कांबळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचा दुजोरा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिला.. बहूचर्चीत आणि तक्रार असणाऱ्या २० कर्मचाऱ्यांची मुख्यालयातंर्गत बदली करण्याची कारवाई सीईओ दिलीप स्वामी यांनी केली आहे. ‘सिंहासन’ने मागील काही दिवसांपूर्वी ‘गामुका’ या कर्मचार्यांच्या कारभारावर बातमी प्रसिद्ध केली होती.
प्युटी सीईओ चंचल पाटील यांनी दिलेल्या माहीतीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या लाच प्रतिबंध कारवाई नंतर सीईओ स्वामी यांनी कडक धोरण अंमलात आणले आहे. वादग्रस्त आणि एकाच टेबलावर ५ वर्षापेक्षा अधिक कार्यासन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदली मुख्यालयातंर्गत करण्यात आले आहे. कनिष्ठ प्रशासनधिकारी २, वरिष्ठ सहाय्यक ०३, कनिष्ठ सहाय्यक १५ आशी बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात झालेले लाचेचे प्रकरण तसेच इतर काही कारणांमुळे झेडपीतील कामाच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. कामानिमित्त आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही कर्मचाऱ्यांना न भेटता थेट अधिकारी यांनाच भेटावे असे आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिले आहेत.


















