Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अनेकांना अश्रू अनावर तर गहिवरलेल्या वातावरणात श्रद्धांजली ; कोठे कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचा सर्वपक्षीय निर्धार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 January 2025
in political
0
अनेकांना अश्रू अनावर तर गहिवरलेल्या वातावरणात श्रद्धांजली ; कोठे कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचा सर्वपक्षीय निर्धार
0
SHARES
768
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनेकांना अश्रू अनावर तर गहिवरलेल्या वातावरणात श्रद्धांजली ; कोठे कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचा सर्वपक्षीय निर्धार

सोलापूर : गहिवरलेल्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली. महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी श्री सिद्धारूढ सांस्कृतिक भजनी मंडळ लक्ष्मण देविदास आणि सहकाऱ्यांनी भजन सादर केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले, माजी महापौर महेश कोठे आणि माझी अनेक दशकांपासूनची मैत्री होती. ते अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व होते. वाघासारखा घडणारा हा नेता होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही पूर्वी बायपास सर्जरी झाल्यामुळे अधिक पदयात्रा करू नका असा आम्ही आग्रह करून देखील त्यांनी नागरिकांशी संपर्क तोडला नाही. विडी घरकुलच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे.

माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया म्हणाले, सर्वसामान्यांसाठी झटणारे, अभ्यासू, विकासाचे ध्येय असणारे नेतृत्व होते. शहरात आयटी पार्क, विधी महाविद्यालयाचे स्वप्न त्यांनी पाहिले. गरिबांची मनापासून काळजी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती.

शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले, महेश कोठे यांच्या निधनाने सोलापूर शहर कासावीस झाले. त्यांच्यावर लोकांचे प्रचंड प्रेम होते. वैचारिक मतभेद असले तरी मनभेद नव्हते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा परिचय सोलापूरकरांना होता. सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यातील आसवे हीच त्यांची खरी संपत्ती होती. हजारो गोरगरीब नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न त्यांनी पाहिले.

प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले, महेश कोठे हे दातृत्व असलेले नेतृत्व होते. महानगरपालिकेचे अनभिषिक्त सम्राट होते. जनतेच्या हृदयातील आमदार होते. लोखंडाला सोने करण्याची कला त्यांच्यात होती. त्यांच्या निधनाने शहर पोरके झाले आहे.

काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, महेश कोठे यांनी गोरगरिबांना तळागाळातून वर आणले. विडी घरकुलसह शहराचा विकास केला. प्रचंड राजकीय ताकद, लोकांचा गोतावळा जमवला. त्यांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.

भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, महेश कोठे हे अभ्यासू नेतृत्व होते. त्यांना संपूर्ण शहराचा अभ्यास होता. विकासाचे ध्येय ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. आयटी सेक्टर च्या माध्यमातून त्यांनी विकासाची दिशा दाखवली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, माजी महापौर महेश कोठे यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. अनेकांना संधी दिली. माणसे पारखली. युथ काँग्रेस तसेच शिवसेनेत सोबत काम करण्याची संधी मिळाली. छत्रपती श्री संभाजी महाराजांची मूर्ती सोलापुरात उभी करण्याचे श्रेय माजी महापौर महेश कोठे यांना जाते. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते सुरेश पाटील, माजी महापौर संजय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) महेश गादेकर, माजी नगरसेवक मधुकर आठवले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, अशोक इंदापुरे, कम्युनिस्ट पार्टीचे युसुफ मेजर, माजी नगरसेवक नागेश वल्याळ आदींनी श्रद्धांजली वाहिली. माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापुरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, सांस्कृतिक तसेच इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

अनेकांना अश्रू अनावर
श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून श्रद्धांजली वाहण्यात येत असताना अनेक महिला भगिनींसह अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

Tags: @सोलापूरMahesh kotheश्रद्धांजली सभा
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीची ही संघटना कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेमध्ये विलीन

Next Post

सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात ; नूतन पालकमंत्र्यांचे….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात ; नूतन पालकमंत्र्यांचे….

सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात ; नूतन पालकमंत्र्यांचे....

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998145
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group