सोलापूर : अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची बदली झाली त्यांच्या जागी बीड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवे अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी शुक्रवारी सायंकाळी संजीव जाधव यांच्याकडून पदभार घेतला.
हे ही वाचा (पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यातील अतिक्रमण बाबत काय म्हणाले)
तुषार ठोंबरे हे यापूर्वी कोल्हापूर येथे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन म्हणून कार्यरत होते. त्यानंतर पदोन्नतीने त्यांची बीड येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.त्यांनी यापूर्वी बारामती, इचलकरंजी, जत येथे प्रांताधिकारी या पदावर काम केले. पुणे आणि कोल्हापूर याठिकाणी जिल्हा पुनर्वसन अधिकारी या पदावर त्यांनी काम पाहिले आहे. सोलापूर, सांगली, सातारा येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच यशदा पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या संचालक पदाचीही त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुणे विभागात सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात 2001 ते 2020 या कालावधीत ते कार्यरत होते.
अरे कॉन्फरन्स हॉल मध्ये एसी नाही का? महसूलमंत्री विखे पाटील
पुणे विद्यापीठातून त्यांनी बीए – अर्थशास्त्र व विधी शाखेतील पदवी संपादन करून 2001 साली सरळ सेवा भरतीने उपजिल्हाधिकारी पदावर त्यांची निवड झाली. 1962 पासूनचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वाधिक गुणांचा उच्चांक मोडून महाराष्ट्रात सर्वप्रथम आले होते.



















