सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. सोबत दिवसभर आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी होते. आमदार देशमुखांनी आपल्या मतदारसंघातील पाथरी गावच्या विविध मागण्याचे निवेदन गावचे उपसरपंच श्रीमंत बंडगर यांच्या सोबतीने पालकमंत्र्यांना दिले.
पाथरी गावासाठी नविन महसुल तलाठी सजा मंजूर असून त्याठिकाणी स्वतंञ तलाठी नियुक्त करणे, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी एकञित ८ वर्गखोल्या (G+1) मंजूर कराव्या अशा महत्वाच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन वाचून पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पाथरीचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द झाला तरी आचारसंहिता संपल्यानंतर कार्यक्रमाला येऊ असे आश्वासन दिले.


















