सोलापूर : कौतम चौक बसवेश्वर सर्कल येथील सुशोभीकरण नगरसेवक अमित जगदीश पाटील यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून केले होते मात्र प्रशासकीय राजवट आल्याने पुढील निधी मंजूर झाला नसल्याने काम रखडले होते व याकरिता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्या विशेष निधीतून या कामाची तरतूद करावी अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
नगरसेवक अमित जगदीश पाटील यांनी वार्ड वाईज निधीतून कौतम चौक येथील 15 ते 20 वर्षांपासून प्रलंबित असलेले सुशोभीकरण काम पूर्णत्वास नेण्याचा विडा हाती घेतला होता, मात्र प्रशासकीय राजवट आल्याने पुढील निधी मंजूर करून घेण्यास अडचण येत असल्याने माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील यांनी बसवेश्वर सर्कल येथे 25 लाखांची विविध कामांची मागणी केली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. जगदीश पाटील यांना आपण निश्चिन्त रहा आपण केलेल्या कामाला वाढीव लागणार निधी देऊ, बसवेश्वर सर्कलचे सुशोभीकरण पूर्णत्वास नेऊ, याकरिता आपण सचिन कल्याणशेट्टी यांच्या संपर्कात राहा असे सांगितले. यावेळी बसवेश्वर सर्कल अध्यक्ष गुरुराज पदमगोंडा,सागर अतनुरे,अक्षय अंजिखाने यांनी केली.
पालकमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या या मागण्या पुढीलप्रमाणे..
1)CCTV कॅमेरे बसविणे- 5 लाख
2)भिंतीच्या आतमध्ये ग्रासबेस तयार करणे-5 लाख
3)बसवेश्वर महाराजांची वचने भिंतीच्या आतील भागात कोरून घेणे-5 लाख
4)पुतळा येथे वर जाऊन हार व पूजन करण्यासाठी स्टील शिडी तयार करणे -5 लाख
5)परिसरामध्ये वचनांची 2 सेल्फी पॉईंट तयार करणे-5 लाख



















