भरणे मामा येणार बाराबंदी घालून सोलापूरच्या अक्षता सोहळ्याला
सोलापूर – महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे काही काळ सोलापूरचे पालकमंत्री होते. त्यांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
निमंत्रण देताना किसन जाधव यांनी योगदंडाचे प्रतीक नंदीध्वज, शेंगापोळी, बाजरी, ज्वारीची भाकरी आणि बाराबंदी पोशाख, ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा, शाल, फेटा आणि पुष्प हार घालून नूतन क्रीडामंत्री यांचा इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीदीप भरणे यांनी देखील यावेळी किसन जाधव यांनी शाल पांघरून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, शहर सरचिटणीस अमोल जगताप, शहर संघटक माऊली जरग, शहर संघटक माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, महादेव राठोड, दीपक आरगेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात याशिवाय देश पातळीवरील दिग्गज नेते कलावंत हेही हजेरी लावतात. यात्रा कालावधीत मानकर्यांसाठी बाराबंदी हा पांढरा शुभ्र पोशाख असतो. तो पोशाख क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना किसन जाधव यांनी देऊन यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.