सोलापूर : दिवंगत, कालकथित सिद्धांत राजाभाऊ कदम याच्या द्वितीय पुण्यानुमोदना निमित्त सोलापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याच्या स्मरणार्थ साबळे प्रसुतीगृह येथे प्रसूत महिलांना ब्लॅंकेट, कानटोपी, लहान मुलांसाठी गाडी, फळे आदीचे वाटप करण्यात आले.
उमेश सुरते, नागेश बंगाळे, अजित गायकवाड, माजी स्थायी समिती सभापती सिद्राम आटेट्नवरू, सुनिल शिवशरण, रमेश कांबळे, रजनीकांत इंगळे, राजेश बनसोडे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी वर्ग, भिम विजय तरुण मंडळातील सर्व सभासदआणि समस्त मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बेघर लोकांना अन्नदान व फळे वाटप करण्यात आले.



















