सोलापूर – होटगी रोड साखर कारखाना जवळ खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु होते. जेसीबीने खड्डा मारताना एक साप जखमी झाला व मातीत गाडला गेला. उपस्थित परशुराम लंबुवाले ह्यानी घटनेची माहिती वाईल्ड लाईफ केअर सोलापूरचे सदस्य गणेश तुपदोळे ह्यांना दिली.
तुपदोळे, अक्षय क्यादास,अश्रफ शेख हे सदस्य घटनास्थळी पोहचले. माती बाजूला सारून घोणस सापास सुरक्षित साधनांचा वापर करून बाहेर काढले. घोणस सापास एक इंच लांब अशी जखम होऊन मांस बाहेर आले होते.
त्यास तात्काळ राहत संस्था डॉ. आकाश जाधव यांना संपर्क साधला व सोलापूर वन विभागास घटनेची माहिती देण्यात आली. रात्रीचे सात वाजले होते. डॉ. जाधव ह्यांनी घोणसची पाहणी केली व घोणस सापासबेशुद्ध करून सर्व जखम स्वच्छ करून टाके घालण्यात आले. त्यावेळी संस्था सदस्य प्रविण जेऊरे, तुपदोळे, तेजस म्हेत्रे सहकार्य केले. तीन तासानंतर घोणस रात्री 11 वाजता पुर्ण शुध्दीवर आला.
सोमवार 21 नोव्हेंबर 22 रोजी घोणसची तपासणी करण्यात आली. घोणसची हालचाल चपळता पूर्ववत होताच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
घोणस साप – विषारी साप असून अंगावर शंकरपाळी सारखी नक्षी असते. करड्या रंगाचे हे सर्प पाल्यापाचोळ्यात दिसुन येत नाहीत. विषारी साप मध्ये सर्वात मोठे विषदंत असणारे साप अशी ओळख. धोका जाणवताच कुकर शिट्टी सारखा आवाज करतात. खुप वेळा ह्या सापास अजगर सापाचे पिल्लु समजून हाताळण्याचा अज्ञान लोक प्रयत्न करतात. हा साप चावल्यास प्रचंड वेदना होतात.





















