सोलापूर : देगाव इथल्या कराळे गल्लीतून एक 26 वर्षीय विवाहिता घरातून न सांगता निघून गेले आहे कुटुंबीयांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
सोनाली गिरीश कराळे असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. 18 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास राहत्या घरातून कुणालाही न सांगता ही महिला निघून गेली तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. शेवटी तिचे पती गिरीश कराळे यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
उंची साडेपाच फूट, रंग गोरा, मराठी, हिंदी व कन्नड या तिन्ही भाषा बोलता येतात असे या महिलेचे वर्णन असून कुठे आढळल्यास सलगर वस्ती पोलिसांशी (0217-2744661)संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



















