Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापरे ! सोलापूर झेडपीच्या 380 शाळेतील तब्बल इतके हजार विदयार्थी गणवेशापासून वंचित ; गुरुसेवा परिवाराने केली ही मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 November 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शासनाच्या विद्यार्थी गणवेश वाटप योजनेची रक्कम खर्ची टाकण्याकरिता राबवण्यात येत असलेली PFMS ही पद्धत नवीन असल्याने अनेक मुख्याध्यापकांना ही प्रणाली लवकर अवगत होऊ शकली नाही. या online किचकट पद्धतीमुळे व दिलेल्या अल्प मुदतीमुळे जिल्ह्यातील  साधारणपणे जिल्ह्यातील 380 शाळांच्या मुख्याध्यापकांना गणवेश खरेदीस विलंब झाला. दरम्यान गणवेश खरेदी न झाल्यामुळे या शाळांना दिलेले अनुदान शासनाकडे परत गेले. यामुळे साधारणपणे 30 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. परत गेलेले अनुदान  पुन्हा द्या अशी मागणी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्या लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार व उपमुख्यलेखा वित्त अधिकारी उत्तम सुर्वे व शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे ( डोगे )यांनी दिली.

 मागील वर्षी जि. प. शाळांची महाराष्ट्र बँकेत खाती उघडण्यात आलेली होती. या खात्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता  सप्टेंबर महिन्यात गणवेशाच्या रक्कमेचे लिमिट सेट करून PFMS प्रणालीद्वारे गणवेश खरेदी करण्याचे सूचित करण्यात आले. याप्रमाणे जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापकांनी गणवेश खरेदी करून त्याचे वाटपही केले परंतु हे करताना दक्षिण सोलापूर मधील 26, उत्तर सोलापूर मधील 22, अक्कलकोट मधील 18, करमाळ्यातील 39, माळशिरस मधील 69, मोहोळ मधील 6, पंढरपुरातील  53, बार्शी मधील 40, माढ्यातील 30, मंगळवेढ्यातील 32, सांगोल्यातील 45 अशा एकूण जिल्ह्यातील 380 मुख्याध्यापकांना या कामी विलंब लागला. दरम्यान या शाळेचे अनुदान शासनाकडे परत गेले व या शाळा गणवेश अनुदानापासून वंचित राहिल्या.

या ही रक्कम नंतर पुन्हा मिळेल असे वाटत असतांना अचानक ही बँक खाती  बंद करून HDFC बँकेत नवीन खाती काढण्याविषयी शासन स्तरावरून सांगण्यात आले आहे. 

आता या राहिलेल्या शाळेतील विद्यार्थी व पालकांकडून वारंवार गणवेशाची मागणी मुख्याध्यापकडे होत आहे. ज्यांनी क्रेडिटवर गणवेश आणले. त्यांच्याकडे गणवेश वितरक रकमेची मागणी करीत आहेत.

याविषयी संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता त्या कार्यालयाकडून एचडीएफसी बँकेत खाते उघडल्यानंतर याचा विचार होईल असे सांगितले गेले. पण अद्याप एचडीएफसी बँकेत अद्याप खाते उघडले गेले नाहीत. यामुळे मुख्याध्यापकांची हेळसांड होत आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व लेखा, वित्त अधिकारी यांनी यात लक्ष घालून मुख्याध्यापकांची होणारी हेळसांड थांबवावी व  किमान प्रजासत्ताक दिनापूर्वी मुलांना गणवेश मिळतील अशी तजवीज करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन देताना सूर्यकांत हत्तुरेसह आदर्श समितीचे नेते बाबा शेख, शिक्षक  संघाचे कार्याध्यक्ष महिबूबसाब सवार, आदर्श समितीचे जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत व्हनमाने, संघाचे नेते सिद्राम कटगेरी आधी गुरुसेवा परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सोलापूरच्या सिद्धेश्वर बँकेची अखेर निवडणूक लागली ; या जागेसाठी होणार मतदान

Next Post

ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या सोशल मीडियावर बातम्या ; कुटुंबीयांनी केले हे आवाहन |

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या सोशल मीडियावर बातम्या ; कुटुंबीयांनी केले हे आवाहन |

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002436
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group